कष्टकऱ्यांचा 'विठ्ठल' काळाच्या पडद्याआड, असंघटीत कामगारांच्या पेन्शनसाठी उभारला होता मोठा लढा
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथाकामगार नेते बाबा आढाव (Baba adhav) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे
Baba Adhav passes away : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार नेते बाबा आढाव (Baba adhav) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आजार होते. पुण्यातील पुना हॉस्पीटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज ुपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकऱ्यांचा विठ्ठल हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. कागद, काच पत्रा वेचणाऱ्यांसह रिक्षा चालक, सफाई कामगार असे जे कामगार असंघटीत आहेत, त्यांच्यासाठी बाबा आढावांनी आपलं आयुष्य वेचलं होतं. या असंघटीत कामगारांना पेन्शन मिळावी यासाठी बाबा आढाव यांनी मोठा लढा उभारला होता.
असंघटीत कामगारांसाठी बाबा आढाव यांचं मोठं योगदान
असंघटीत कामगारांसाठी बाबा आढाव यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या हक्कासांठी बाबा आढाव यांनी लढाई लढली आहे. युपीए सरकारच्या काळात असंघटीत कामगारांना पेन्शन मिळावी यासाठी बाबा आढाव यांनी पुढकार घेतला होता. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. यावेळी सोनिया गांधी या युपीएच्या अध्यक्षा होत्या. यावेळी बाबा आढाव यांनी असंघटीत कामगारांना पेन्शन मिळावी यासाठी मोठं आंदोलन देखील उभं केलं होतं.
एका गाव एक पाणवठा चळवळ
डॉ. बाबा आढावांवर महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा खोलवर प्रभाव होता. त्यातूनच त्यांनी हमाल पंचायत सारख्या संघटनेची स्थापना केली. जातीय भेदभावाला विरोध म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर एक गाव एक पाणवठा ही चळवळ चालवली. बाबा आढावांनी एक गाव, एक पाणवठा' चळवळ जातीय भेदभावाविरुद्ध चालवली होती, ज्याचा उद्देश दलितांना आणि समाजातील मागासवर्गीयांना गावातील सार्वजनिक पाणवठ्यांवर पाणी भरण्याचा समान हक्क मिळवून देणे हा होता. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सामाजिक समानतेसाठी एक मोठे आंदोलन ठरली, ज्यात सर्व जातींच्या लोकांना एकाच पाणवठ्यावर पाणी भरण्यास प्रोत्साहन दिले गेले.
डॉ. सायरस पूनावालांना पुण्यभूषण पुरस्कार, शरद पवारांनी बाबाा आढावांचाही केला सन्मान
सिरम इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून लसनिर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. सायरस पूनावाला यांना 2014 चा पुण्यभूषण पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला होता. यावेळी पुरस्काराची रक्कम ही 1 लाख रुपये होते. पण ही पुरस्काराची रक्कम उचीत व्यक्तीला द्यावी, असी विनंती डॉ. सायरस पूनावाला यांनी शरद पवारांनी केली होती. या 1 लाख रुपयांमध्ये आणखी 9 लाख रुपये देत सायरस पूनावाला यांनी घातले. हे सर्व पैसे शरद पवार यांनी सामाजिक कामासाठी बाबा आढाव यांनी दिले होते.
1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक
1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी ओळख होती.
महत्वाच्या बातम्या:























