एक्स्प्लोर
अवनीला थेट गोळ्या घातल्या, कथित वन कर्मचाऱ्यांची ऑडिओ क्लिप
अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत, तिला आधी गोळ्या झाडून ठार मारण्यात आले आणि त्यानंतर तिच्या शरीरावर डार्ट मारण्यात आला, असं संबंधित व्यक्ती आपापसात बोलत आहेत.
नागपूर : अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झालाच नाही, तर तिला थेट गोळ्या घातल्या, असा संवाद असलेली एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हे दोन व्यक्तींचं मोबाईल संभाषण असून या व्यक्ती कोण आहेत, हे स्पष्ट झालेलं नाही.
अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत, तिला आधी गोळ्या झाडून ठार मारण्यात आले आणि त्यानंतर तिच्या शरीरावर डार्ट मारण्यात आला, असं संबंधित व्यक्ती आपापसात बोलत आहेत.
वन विभागाने अवनीला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न केल्यानंतर तिने वन विभागाच्या बचाव पथकावर हल्ला केल्यामुळे तिला गोळ्या घातल्याचं सांगितलं जात होतं. या कथित ऑडिओ क्लिपिमध्ये मात्र वाघिणीला थेट गोळ्या घातल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आधीच संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले 'ऑपरेशन टी वन' आणखी वादात सापडतं की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
वन्य कायद्यानुसार एखादा वन्य प्राणी जर हिंसक बनत असेल तर त्याला बेशुद्ध करुन पकडणं, असा नियम आहे. मात्र अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार मारण्यात आलं, असा आरोप केला जात आहे.
ऐका ऑडिओ क्लिप:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement