एक्स्प्लोर
रस्त्यावरील वस्तूवर पाय पडल्याने स्फोट, दोन मुलं जखमी

औरंगाबाद: रस्त्यावर पडलेल्या स्फोटक वस्तूवर पाय पडल्याने दोन स्फोट होऊन दोन बालकं जखमी झाली आहेत. किराडपुरा भागात सकाळी ही घटना घडली.
या स्फोटात लाल बहादूर शास्त्री विद्यालयात शिकणारी 10 वर्षाची इंफ्रा निस आणि 11 वर्षाचा वसीम खान हे दोघे जखमी झाले.
सकाळी दूध घरी नेताना इंफ्राचा पाय स्फोटकावर पडला. पाय पडल्याने स्फोट जाला आणि इंफ्रा त्यात जखमी झाली.
यावेळी इंफ्राला वाचव्यासाठी वसीम धावला असता, त्याचा पायही स्फोटक वस्तूवर पडला आणि दुसरा स्फोट झाला.
दरम्यान या स्फोटांची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. हे स्फोट किरकोळ असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बीड
बातम्या
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
