एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू
![औरंगाबादमध्ये पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू Aurangabad Youth Dies As He Jumped Into The Police Van औरंगाबादमध्ये पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/27122031/Aurangabad_Youth_Death.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. राहुल गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे.
मोटारसायकल चोरीच्या चौकशीसाठी राहुल गायकवाडला क्राईम ब्रान्चने चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. तपासासाठी आज घेऊन जात असताना राहुलने पोलिसांच्या गाडीतून उडी मारली. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
मात्र पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा दावा मयत राहुल गायकवाडच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा मृत राहुल गायकवाडच्या नातेवाईकांनी दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)