एक्स्प्लोर
औरंगाबाद शिवसेनेत धुसफूस, जिल्हाप्रमुखांच्या हकालपट्टीची मागणी

औरंगाबाद : औरंगाबाद शिवसेनेतली धूसफूस उघड झाली आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. दानवेंनी शिवसेना पक्ष विकायला काढला असून ते पक्षातील पदं विकत असल्याचा आरोप आमदार शिरसाठ यांनी केला आहे. शिरसाठ यांच्यासोबतच माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही दानवेंच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. दुसरीकडे दानवेंनी मात्र आमदार शिरसाठ यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे औरंगाबादमधील शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचं चित्र आहे.
आणखी वाचा























