एक्स्प्लोर

शिक्षकांनी कामाच्या ठिकाणी राहण्याचा मुद्दा पुन्हा पेटणार, आमदार बंब शिक्षक दिनी काढणार मोर्चा

Aurangabad : आमदार बंब शिक्षकांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाल्याने कामाच्या ठिकाणी न राहणाऱ्या शिक्षकांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : शिक्षकांनी कामाच्या ठिकाणी राहण्याच्या मागणीबाबत भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) पुन्हा एकदा आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. आमदार प्रशांत बंब हे येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी कामाच्या ठिकाणी न राहण्याऱ्या शिक्षकांच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा शिक्षक, शिक्षक संघटना आणि शिक्षक आमदार विरुद्ध आमदार प्रशांत बंब असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. आमदार बंब यांनी शिक्षकांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाल्यानं कामाच्या ठिकाणी न राहणाऱ्या शिक्षकांची मोठी अडचण झालीय. विशेष म्हणजे 5 सप्टेंबर रोजीच्य मोर्चात पालकही सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

जिल्हा परिषद शिक्षक कामाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी हाच मुद्दा विधानसभेत देखील मांडला होता. कामाच्या ठिकाणी राहत नसलेल्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणी देखील आमदार बंब यांच्याकडून सतत केली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये बंब यांच्याबद्दल रोष पाहायला मिळाला होता. अनेक ठिकाणी शिक्षकांनी आमदार बंब यांच्याविरोधात आंदोलन देखील केले होते. मात्र, मागील काही दिवसांत हा मुद्दा मागे पडला असल्याचे चित्र असतानाच आता बंब पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.


शिक्षकांनी कामाच्या ठिकाणी राहण्याचा मुद्दा पुन्हा पेटणार, आमदार बंब शिक्षक दिनी काढणार मोर्चा

आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षक कामाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे, राज्यात आमदार बंब विरुद्ध शिक्षक असे युद्ध पाहायला मिळाले होते. विशेष म्हणजे आमदार बंब आणि शिक्षकांमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. आपलाच मुद्दा कसा वैध आहे हे सांगण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले गेले. दरम्यान, याच काळात औरंगाबादच्या खुलताबादच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात येणार असल्याचं पत्र काढले होते. त्यामुळे याला शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. त्यानंतर आता आमदार प्रशांत बंब यांच्याकडून थेट मोर्चा काढला जाणार आहे. 

शिक्षक संघटना पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता...

शिक्षकांच्या कामाच्या ठिकाणी राहण्याच्या मागणीबाबत भाजप आमदार प्रशांत बंब पुन्हा एकदा आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. जे शिक्षक कामाच्या ठिकाणी राहत नाही त्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्याच्या मागणीसाठी आमदार बंब यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेवर 5 सप्टेंबर रोजी हा मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिक्षक संघटना देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे. जर आमदार बंब यांनी मोर्चा काढल्यास त्यांना शिक्षक संघटना देखील मोर्चा काढून उत्तर देणार असल्याची माहिती मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

शिक्षकांच्या मुख्यालयाचा मुद्दा बंब यांची वैयक्तिक भूमिका; भाजप नेत्यांनी हात झटकले

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde On Bollywood Actors Pan Masala Advertisement: शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget