CCTV in Village: औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक गाव आता CCTV च्या निगराणीत, अशी आहे पोलिसांची संकल्पना
CCTV Camera : गावाचे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन महत्वाचे रस्ते, बाजारपेठ, चौक, वाहनतळ, हा संपुर्ण परिसर सी.सी.टी.व्ही. प्रणालीच्या निगराणीत येणार आहे.
CCTV Camera in Village : ग्रामीण भागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि प्रत्येक गावाच्या (Village) सुरक्षेच्या दृष्टीने औरंगाबाद (Aurangabad) ग्रामीण पोलिसांकडून महत्त्वपूर्ण संकल्पना मांडण्यात आली असून, याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या संकल्पनेतुन औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील पोलीस स्टेशन हद्यीतील गावामध्ये लोकसहभागातून सी.सी.टी.व्ही कॅमेरा प्रणाली बसविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच व्यापारी यांनी पुढाकार घेवुन गावामध्ये लोकसहभागातुन किमान 10 सी.सी.टि.व्ही. कॅमेरा बसविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ज्यामुळे गावाचे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन महत्वाचे रस्ते, बाजारपेठ, चौक, वाहनतळ, हा संपूर्ण परिसर सी.सी.टी.व्ही. (CCTV) प्रणालीच्या निगराणीत येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी असोसिशयन, स्थानिक स्वयंसेवी संस्था, एन.जी.ओ. आणि स्थानिक नागरिक, हे प्रायोजकत्व घेवून ते सी.सी.टि.व्ही. कॅमेरा प्रणाली डोनेट करून बसवू शकतात. याचप्रमाणे व्यापारी अथवा नागरिकांनी त्यांचे परिसरात बसविलेल्या कॅमेरांची दिशा आणि फोकस हा मुख्य रस्त्याचे दिशेने नसेल तर, स्थानिक पोलीसांचे मदतीने त्यांची दिशा ही रस्त्याचे अनुषंगाने व्यवस्थित करून घेणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या डि.व्ही.आरमध्ये कॅमेरा स्लॉट शिल्लक असल्यास रस्त्याचे किंवा चौकाचे दृश्य घेता येईल या दृष्टीकोनातुन एक अतिरिक्त कॅमेरा बसविण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहेत.
या मोहीमेमध्ये अधिकाअधिक नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होवून आपला परिसर अधिक सुरक्षित ठेवण्यात पोलीसांना सहकार्य करावे. जेणे करून पोलीसांना या कॅमेराचे मदतीने गुन्हयांना प्रतिबंध घालणे शक्य होवुन, गुन्हयांची उकल करण्यासाठी महत्वाची मदत होईल. याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानिक पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी याचेशी संपर्क साधून कॅमेराचे दृश्य स्थिती ही योग्य ती ठेवण्यासाठी यथोचित सहकार्य करीतल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
असा होणार फायदा...
मागील काही दिवसांत अनेक गावात छोट्या-छोट्या कारणावरून वाद होतात. मात्र, गावात असा काही प्रकार घडल्यास सीसीटीव्हीत ते कैद होईल. सोबतच सीसीटीव्हीच्या भीतीने अनेकजण वाद टाळतील. तसेच अनेकदा गावात चोरीच्या घटना घडतात. त्यामुळे गावात चोरी करण्यासाठी येणारे चोर देखील सीसीटीव्हीत कैद झाल्यास त्यांना शोधणे सोपं होईल. सोबतच गावात अनोळखी येणारे जाणारे लोकांवर देखील नजर ठेवता येईल. त्यामुळे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या संकल्पनेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
पावसाने पाठ फिरवली, 40 दिवसांत 7 शेतकऱ्यांची आत्महत्या; औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील परिस्थिती