एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्ताव विरोध प्रकरण, एमआयएम नगरसेवक अटकेत
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या औरंगाबादच्या एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना रात्री अटक करण्यात आली आहे.
औरंगाबाद : केल्याने भाजप नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकाला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना रात्री अटक करण्यात आली आहे.
सय्यद मतीन यांच्याविरोधात जातीय तेढ निर्माण करणे आणि दंगल घडविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे मतीन याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक प्रमोद राठोड, राज वानखेडे आणि विजय आवताडे यांच्याविरोधातदेखील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
शिवसेनचे राजू वैद्य यांनी 'भारतरत्न' अटलजींचा श्रद्धांजली प्रस्ताव मांडला. मात्र सय्यद मतीन यांनी या प्रस्तावाला विरोध केला. यानंतर संतापलेले नगरसेवक प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे हे मतीन यांच्यावर धावून गेले. यापुढे जाऊन त्यांनी मतीन यांना बेदम मारहाण करुन सभागृहाबाहेर बाहेर काढलं. तसंच सय्यद मतीनला कायमस्वरुपी निलंबित करावं, अशी मागणीही या नगरसेवकांनी केली आहे.
सय्यद मतीन यांना मारहाणीनंतर संतप्त झालेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोरील भाजप संघटना मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड केली. तोडफोड केल्याप्रकरणी नगरसेवकासह एमआयएमच्या 100 कार्यकर्त्यांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही पक्षाची भूमिका नाही : इम्तियाज जलील
श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला विरोध करणं ही एमआयएमची भूमिका नाही, ते सय्यद मतीन यांचं वैयक्तिक मत होतं, असं स्पष्टीकरण एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिलं. एमआयएम या नगरसेवकाच्या पाठीमागे उभं राहणार नसून याला समर्थन देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
व्हिडीओ :
संबंधित बातम्या
वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, MIM नगरसेवकाला बेदम चोप
नगरसेवकाला मारहाणीनंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा राडा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement