एक्स्प्लोर
Advertisement
एटीएम पासवर्ड हेरुन अकाऊण्टमधील रक्कम लंपास, भामट्याला बेड्या
एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांचा पासवर्ड मोहम्मद सलीम हाजीरखान हेरायचा. एटीएम खराब झालं आहे, ट्रान्झॅक्शन रद्द झालं असं सांगून तो युझर्सला एटीएम सेंटर बाहेर पाठवायचा
औरंगाबाद : एटीएममध्ये व्यवहार करताना जर तुमच्या बाजूला कोणी उभं असेल, तर तुम्हाला काळजी बाळगण्याची गरज आहे. हरियाणातील मोहम्मद सलीम हाजीरखान या भामट्यानं औरंगाबादमध्ये अशाप्रकारे पावणेसहा लाखांची रक्कम हडप केली आहे.
एटीएममध्ये मोहम्मद कसा गंडा घालयचा?
एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांचा पासवर्ड मोहम्मद सलीम हाजीरखान हेरायचा. एटीएम खराब झालं आहे,
ट्रान्झॅक्शन रद्द झालं असं सांगून तो युझर्सला एटीएम सेंटर बाहेर पाठवायचा. क्षणातच युझर्सने मशिनवर ऑपरेट केलेली रक्कम हडपण्याचा कारनामा तो करत असे.
आरोपीकडे अनेक बनावट एटीएम कार्ड मिळून आली आहेत. लोकांना बोलण्यात गुंगवून तो कार्डची अदलाबदल करत असे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या मोहम्मदच्या अन्य साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. आतापर्यंत या टोळीने 14 जणांना पावणेसहा लाखांना फसवल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
तुम्ही काय काळजी घ्याल?
एटीएम मशिनवर तुम्ही व्यवहार करत असताना कोणी संशयास्पदरित्या आजुबाजुला फिरकत असेल, तर त्यांना बाहेर थांबायला सांगा.
एटीएममधून पैसे निघत नसतील किंवा विलंब होत असेल, तर पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत थांबा. एटीएमपासून दूर जाताना ट्रॅन्झॅक्शन कॅन्सल करा.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement