एक्स्प्लोर

Aurangabad BJP Protest : सरकाराला मुंबईबाहेर राज्य आहे हे माहिती नाही : देवेंद्र फडणवीस

Aurangabad BJP Protest : औरंगाबादमधल्या पाणीटंचाईवरुन आक्रमक भूमिका घेत भाजप आज रस्त्यावर उतरली आहे. या जल आक्रोश मोर्चाची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर....

LIVE

Key Events
Aurangabad BJP Protest : सरकाराला मुंबईबाहेर राज्य आहे हे माहिती नाही : देवेंद्र फडणवीस

Background

औरंगाबाद : औरंगाबादमधल्या पाणीटंचाईवरुन आक्रमक भूमिका घेत भाजप आज रस्त्यावर उतरली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पैठणगेट ते औरंगाबाद महापालिका कार्यालयापर्यंत जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि डॉ. भागवत कराड यांच्यासह प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. या मोर्चाची तयारी सुरु आहे. या मोर्चासाठी जवळपास  तीन हजार हंडे आणि आठ हजार झेंड्याची ऑर्डर देण्यात आली होती आणि आता हे साहित्य आता औरंगाबाद भाजप कार्यालयात पोहोचलंय. 

औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून भाजपकडून 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात येत असून मोर्चाला प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळत आहे. शहरातील पैठणगेट येथून या मोर्च्याला सुरवात झाली आहे. यावेळी भाजपचे आमदार,माजी नगरसेवक आणि महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती सुद्धा पाहायला मिळत आहे. 

पैठण गेट येथून निघणारा मोर्चा औरंगाबाद महानगरपालिकेच्या कार्यालयावर धडकणार आहे. तर या मोर्च्यात तीन हजार महिला हंडे घेऊन सहभागी झाल्या आहेत. तर एवढी वर्षे महानगरपालिकेत सत्ता असताना शिवसेना पाणी प्रश्न मिटवू शकली नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.तर मोर्चा आता महानगरपालिकेच्या कार्यालयाकडे निघाला आहे. मोर्चामध्ये भाजप महिला कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी जोगावा मागून  निषेध नोंदवला आहे. 

औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त  आस्तिककुमार पांडे यांनी मात्र पाणीटंचाई कृत्रिम नसून शहरात कमी प्रमाणात पाणी येतं त्यामुळे पाणी टंचाई असल्याचं म्हटलं शिवाय  शहरवासीयांवर बंधने देखील घातली आहे . यापुढे महानगरपालिकेचे पाणी बांधकाम व्यवसायिक बांधकामाकरता वापरू शकत नाही गाडी धुणे, रस्ते धुणे यासाठी देखील पाणी वापरण्यास मनाई केली आहे.

19:48 PM (IST)  •  23 May 2022

Devendra Fadnavis :  सरकाराला मुंबईबाहेर राज्य आहे हे माहिती नाही : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis :  मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहे की नाही? असा प्रश्न पडत आहे. औरंगाबाद मराठवाड्याच्या राजधानीच शहर आहे हे त्यांना माहितच नाही वाटते. या सरकाराला मुंबईबाहेर राज्य आहे हे माहिती नाही, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. 

19:40 PM (IST)  •  23 May 2022

Devendra Fadnavis : संभाजी नगरच्या इतिहासातील सगळ्यात मोठा मोर्चा

Devendra Fadnavis : संभाजी नगरच्या इतिहासातील सगळ्यात मोठा मोर्चा आहे.  हा जनतेचा आक्रोश आहे. भाजप हा जनतेचा पक्ष आहे. जो पर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही. 

19:31 PM (IST)  •  23 May 2022

दोन मंत्री जेलमध्ये आणि मुख्यमंत्री घरात असे हे सरकार आहे : रावसाहेब दानवे

दोन मंत्री जेलमध्ये आणि मुख्यमंत्री घरात असे हे सरकार आहे, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकरवर केली आहे. 

19:31 PM (IST)  •  23 May 2022

ही तर 'जुम्मे के जुम्मे' सरकार: रावसाहेब दानवे

BJP JAL AAKROSH MORCHA : पिण्याचा पाण्याचा प्रश्न तुम्हाला सांगायची गरज नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना सोळाशे कोटी ररुपयांची योजना मंजूर केली. पण सत्ता बदलली आणि योजणार रखडली. जेव्हा मुख्यमंत्री घरात होते फडणवीस तुमच्या दारात होते. त्यांनतर मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडले. 

19:30 PM (IST)  •  23 May 2022

राज्य सरकारचं नाव महाविकास आघाडी सरकार नसून, जुम्मे के जुम्मे सरकार आहे : रावसाहेब दानवे

राज्य सरकारचं नाव महाविकास आघाडी सरकार नसून, जुम्मे के जुम्मे सरकार आहे, अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहितीMahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धारSanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
Embed widget