एक्स्प्लोर

औरंगाबाद शहराचं नाव आणि इतिहास; 'संभाजीनगर'ची मागणी कुठून आली?

औरंगबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नामांतरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनसेनं आता औरंगाबादचं संभाजीनगर नामांतराचा मुद्दा हायजॅक केला आहे. मात्र औरंगाबाद शहराचा नावाचा इतिहासही तेवढात मोठा आहे.

औरंगाबाद : औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर झालं पाहिजे ही गेल्या 30 वर्षांपासूनची मागणी आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक तर याच मुद्द्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून लढवली जात आहे. शिवसेना-भाजपची राज्यात दोनदा सत्ता येऊनही त्यांनी या शहराचं नाव बदललं नाही. आता मनसेनंही औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उचलून धरला आहे. मात्र औरंगाबाद शहराचा इतिहास जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.

औरंगाबाद शहर पुरातन आणि इतिहासाचं वरदान असलेलं शहर आहे. या शहराच्या अंगाखांद्यावर इतिहासनं आपल्या पाऊलखुणा सोडल्या आहेत. बिवी का मकबरा, पानचक्की, ऐतिहासिक दरवाजे, नहर-ए-अंबरी अशा एक ना अनेक वास्तू या शहराला शशोभित करतात. निवडणुका आल्या की ऐतिहासिक औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर करण्याची मागणी राजकीय व्यासपीठावरुन नेहमीच सुरु होते. गेली 30 वर्ष हा मुद्दा शिवसेना-भाजप प्रतिष्ठेचा बनवत महापालिका निवडणुकीत प्रचार करत सत्तेत आली. मात्र आता शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत गेल्याने मनसे हा मुद्दा काबीज करत औरंगाबादकरांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करत आहे.

औरंगाबाद शहराच्या नावाचा इतिहास

मुंबईच्या कान्हेरी गुफांमध्ये एक शिलालेख सापडला होता. त्यात औरंगाबादचं नाव राजतडक असल्याचं आढळून आलं होतं. हे नाव कुणी ठेवलं, त्या नावाचा वास्तविकतेशी काय संबंध आहे का? यावर अजूनही प्रकाश पडलेला नाही. या शहराचं प्रसिद्ध नाव म्हणजे खडकी. बेसाल्ट खडकावर वसलेला हा परिसर आहे. त्यात शहरात अगदी प्राचिन असं खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याच नावावरुन या शहराचं नाव खडकी पडलं असावं, अशी इतिहासात नोंद आहे. त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता. खऱ्या अर्थानं नहरे-ए-अंबरी सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारुन त्यानं या गावाचं शहर केलं. मात्र त्यानंही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही. कालांतराने 1633 मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्यानं आपल्या नावावरुन या शहराचं नाव फतेहनगर असं ठेवलं. 1653 मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला. त्याने पुन्हा या शहराचं नाव फतेहनगर बदलून खुजिस्ता बुनियाद असं ठेवलं. कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आलं आणि त्यानंतर या शहराला सध्याचे औरंगाबाद हे नाव मिळालं. ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिलं.

औरंगबादमधील सभेत 1988 मध्ये पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगरचा नारा दिला होता. तेव्हापासून शिवसेना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेल करते. आजही सामना वर्तमानपत्रात संभाजीनगर असंच लिहलं जातं. यापूर्वी 9 नोव्हेंबर 1995 ला शहराचे संभाजीनगर असं नामकरण करण्यासाठी असाच प्रस्ताव महापालिकेने पाठवला होता. मात्र 2001 ला काँग्रेस आघाडी सरकारने हा प्रस्ताव रद्द ठरवला होता. औरंगाबाद की संभाजीनगर या वादावरुन महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपने महापालिकेवर 30 वर्ष राज्य केलं. आता महापालिका निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र यातून पायाभूत सुविधांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते सुटणार आहे का याचं उत्तर कुणाजवळही नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

व्हिडीओ

Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
Embed widget