एक्स्प्लोर

मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन सुरुच

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह अधिकाऱ्यांसोबत बैठक होऊनही तोडगा न निघाल्याने शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचं 'लेखणी बंद' आंदोलन सुरुच राहणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून 'काम बंद' आंदोलन करण्याचा इशारा विद्यापीठ कर्मचारी कृती समितीने दिला आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने सुरु असलेले 'लेखणी बंद' आंदोलन अद्यापही सुरु आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह अधिकाऱ्यांसोबत बैठक होऊनही सोमवारी (28 सप्टेंबर) तोडगा न निघाल्याने संप सुरुच राहणार आहे.

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून (24 सप्टेंबर) लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. दुसऱ्या दिवशी आंदोलन अधिक तीव्र करुन परीक्षा विभागाचे काम पूर्णत: ठप्प झाले. मागण्या मान्य न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून 'काम बंद' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यापीठ कर्मचारी कृती समितीचे राज्य समन्वयक डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिला आहे.

केंद्र आणि राज्यशासनाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करुन दोन वर्षांचा कालावधी लोटला. राज्य शासनाने उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापक प्रवर्गासह सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. तथापी राज्यातील 14 विद्यापीठांचे कर्मचारी, अधिकारी अजूनही या आयोगाच्या लाभापासून वंचित आहेत. या संदर्भात राज्यशासन, मंत्री यांच्यासोबत वारंवार बैठका पार पडल्या. मात्र सातव्या वेतन आयोगासह कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती अनेक विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालये कर्मचारी संयुक्त कृती समिती स्थापना करण्यात आली आहे. या कृती समितीची गेल्या आठवड्यात ऑनलाईन बैठक होऊन 20 ते 30 सप्टेंबर दरम्यान लेखणी बंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. तर 1 ऑक्टोबरपासून सर्व कर्मचारी संपूर्ण काम बंद करुन संपात सहभागी होणार आहेत.

मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन सुरुच

राज्य शासन केवळ तोंडी आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र बनलेल्या आहेत. या राज्यव्यापी आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुमारे 450 अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर फिजिंकल डिस्टसिंन्ग ठेऊन कर्मचारी सहभागी झाले. कर्मचाऱ्यासमोर महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर, संघटनेचे अध्यक्ष पर्वत कासुरे, उपकुलसचिव डॉ.दिगंबर नेटके यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात संघटनेचे सचिव प्रकाश आकडे, जीवन डोंगरे, अनिल खामगांवकर, महिला प्रतिनिधी डॉ.सुनीता अंकुश यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले. दरम्यान, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी कर्मचारी यांनी परीक्षेचे पूर्ण काम बंद केले, त्यामुळे याचा परिणाम परीक्षांवर होण्याची शक्यता आहे. दिवसभरात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.फुलचंद सलामपुरे, डॉ.राहुल म्हस्के, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.उल्हास उढाण, अधिसभा सदस्य डॉ.स्मिता अवचार, डॉ.चव्हाण, डॉ.सुनील मगरे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे आदींनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली, पाठिंबा देखील दिला यापुढेही सदर आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार आहे.

'बामुक्टो'चा पाठिंबा दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघ बामुक्टो यांच्यावतीने शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. संघटनेचे नेते डॉ.विक्रम खिल्लारे, डॉ.मारोती तेगमपुरे, डॉ.उमाकांत राठोड, डॉ.दिलीप बिरुटे, डॉ.शेख शफी आदी उपस्थित होते. तसेच असोसिएशन ऑफ प्रिंसिपल्स अ‍ॅण्ड एज्युकेटर्सचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.धनंजय वडमारे यांनी देखील भेट घेऊन लेखी पाठिंबा दिला. तर 'एसएफआय'च्यावतीने कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आल्याचे लोकेश कांबळे यांनी घोषित केले.

मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन सुरुच

मंत्र्यासोबतची बैठक निष्फळ दरम्यान, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सचिव, संचालक यांच्या समवेत सोमवारी (28 नोव्हेंबर) सकाळी बैठक झाली. तासभर विविध प्रश्नांवर चर्चा झाली. मात्र तोडगा काही निघाला नाही. दोन महिन्यात मागण्या मान्य करु, असे मंत्री म्हणाले. तथापि शासन आदेश अथवा लेखी पत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget