सोलापुरात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करत जाळण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत
लॉकडाऊनदरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलं आहे.

पंढरपूर : संचारबंदीच्या काळात कर्तव्य बजावत असताना झालेल्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे ही घटना घडली आहे. काल सायंकाळी माळशिरस तालुक्यातील मळोली गावाजवळ पोलीस कर्मचारी संचारबंदीची अंमलबजावणी करत असताना एकाने पोलिसाला धमकावत प्राणघातक हल्ला केला.
यानंतर या आरोपीने थेट गाडीतील पेट्रोलची बाटली काढून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ओतून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. याची फिर्याद पोलीस कर्मचाऱ्याने वेळापूर पोलिसात दिली आहे. यावेळी जवळ असलेले काही नागरिकांनी या पोलिसाला यातून सुखरुप वाचवून पोलीस स्टेशनपर्यंत आणलं. पोलिसांनी याची गंभीर दाखल घेत आरोपीला अटक करत त्याच्यावर प्राणघातक हल्ला व सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
Worli Pattern | 'वरळी पटर्न' देशभर राबवण्याची शक्यता; केंद्रीय पथकाकडून कौतुक
प्रशासनाच्या सतर्कतेमुळे माळशिरस तालुक्यात कोरोनाला नो एन्ट्री
पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माळशिरस तालुक्यात जिल्हाबंदी काटेकोरपणे पाळली जात असल्याने येथे कोरोनाला अजूनही एन्ट्री घेता आली नाही. पुणे अथवा सातारा जिल्ह्यातील कोणालाच येथे प्रवेश करता येणे अशक्य बनले आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूजला चिटकून सराटी गावाजवळ पुणे जिल्ह्याची सीमा सुरु होते. या परिसरातील अनेक तरुण नोकरी व उद्योग व्यवसायामुळे पुण्यात जा-ये करत असतात.
मात्र पुण्यात कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासून पुण्याकडून कोणालाही पोलिसांनी अकलूजमध्ये प्रवेश करू दिलेला नसून आपत्कालीन यंत्रणेतील प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करूनच हे वाहन पुढे जाऊ दिले जात आहे. या वाहनाला सुरुवातीला सॅनिटाईझ करून घेऊन मग चालकाचे थर्मल स्कॅनिंग केले जाते . याशिवाय या प्रत्येक गाडीचे व्हिडीओ शूटिंग केल्याशिवाय त्याला पुढे जात येत नाही. याचा पद्धतीने सातारा जिल्ह्याची सीमा देखील पिलीव व धर्मपुरीजवळ असून येथेही याच पद्धतीने काटेकोर तपासणीमुळे बाहेरून कोणालाही माळशिरस तालुक्यात प्रवेश करता येत नसून यामुळे अप्रत्यक्षपणे कोरोनाला येथे नो एन्ट्री करण्यात प्रशासनाला यश आलेले आहे.



















