एक्स्प्लोर
कोरोनाविरोधातल्या लढ्याला MMRDAकडून बळकटी, BKCमध्ये 1000 खाटांच्या रुग्णालयाची तयारी सुरु
कोरोना विरोधातल्या लढ्याला एमएमआरडीएकडून बळकटी देण्यात आली आहे. एमएमआरडीएकडून बीकेसीमध्ये 1000 खाटांचे रुग्णालय तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
मुंबई : सध्या सुरू असलेल्या करोना व्हायरसच्या विरोधातल्या लढ्याला बळ देण्यासाठी आणि कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 1,000 रुग्णांच्या विलगीकरणाची सोय करण्यासाठी 1000 खाटांचे रुग्णालय निर्मितीची प्रक्रिया सुरु केली आहे. महाराष्ट्राचा कोरोना व्हायरसविरोधातला लढा हा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. एमएमआरडीएकडून निर्माण केल्या जाणाऱ्या या नॉन क्रिटिकल म्हणजेच तब्येत गंभीर नसलेल्या रुग्णांसाठीच्या विलगीकरण सुविधेमुळे वैद्यकीय सेवावर पडलेला ताण कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयामधल्या खाटांची संख्या सध्या 1,000 आहे. यापैकी 500 बेडवर ऑक्सिजनची सोय असेल. ही क्षमता गरजेनुसार 5,000 पर्यंत वाढवता येईल, अशी देखील माहिती आहे.
या नॉन क्रिटिकल कोविड रुग्णालयाच्या उभारणीचा पूर्ण खर्च हा प्राधिकरणातर्फे करण्यात येईल. या सुविधेच्या स्थापनेसाठी आरेखन व तांत्रिक सहाय्य ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातर्फे सामाजिक दयित्वातून (Corporate Social Responsibility- CSR) उपलब्ध करण्यात आला आहे. तिथे असलेल्या रुग्णांच्या नियमित तपासण्या करण्यासाठी या रुग्णालयांमध्ये पॅथॉलॉजी लॅबची सोय असेल. यात सर्वसाधारण रक्त तपासणी करता येईल. आरोग्य सेवा देणाऱ्या इतर संस्थांच्या धर्तीवर या रुग्णालयांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल. त्याचबरोबर इथे डॉक्टर व वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध असतील व त्यांच्या निवार्याची सोय सुद्धा असेल.
याबाबत महानगर आयुक्त आर ए राजीव यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रसार रोखताना वैद्यकीय व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये कोरोनाग्रस्तांची झालेली वाढ लक्षात घेता विलगीकरण सुविधा वाढवण्याची गरज जाणवत होती. महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार संशयित कोविड-19 रुग्णांसाठी हे नान क्रिटिकल हॉस्पिटल स्थापन करण्यात येत असून, गरज पडल्यास याची क्षमता सुद्धा वाढवण्यात येईल. या सुविधेमुळे कोरोनाच्या विरोधातल्या लढ्याला बळकटी मिळेल, असं ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement