एक्स्प्लोर
FARMER DISTRESS: बळीराजासाठी उजळले ७००० दिवे, अनोखा दीपोत्सव
मीरा भाईंदरमधील (Mira Bhayandar) पेंडकरपाडा गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दीपोत्सवातून 'संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे' असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात स्थानिकांनी एकत्र येत सात हजाराहून अधिक दिवे प्रज्वलित केले. शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता आणि एकता व्यक्त करण्यासाठी खांद्यावर नांगर घेतलेल्या बळीराजाची तब्बल ७० फूट उंच प्रतिकृती साकारण्यात आली. मराठवाडा आणि विदर्भातल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना धीर देणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. या अनोख्या उपक्रमातून गावकऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















