एक्स्प्लोर
Dahisar Fire: शिंदे शिवसेनेच्या River Festival जवळ भीषण आग, नागरिकांची उडाली प्रचंड धावपळ
मुंबईच्या दहिसर पश्चिम (Dahisar West) परिसरातील मेघा पार्टी हॉलला (Megha Party Hall) भीषण आग लागल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे, ज्या ठिकाणी आग लागली त्याच्या समोरच शिंदे यांच्या शिवसेनेकडून (Shinde Shiv Sena) दहिसर रिवर फेस्टिवलचे (Dahisar River Festival) आयोजन करण्यात आले होते. या आगीमुळे फेस्टिवलसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि त्यांची प्रचंड धावपळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले आहे. या आगीत संपूर्ण पार्टी हॉल जळून खाक झाला असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















