एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य

Chandrashekhar Bawankule : नगरपालिका निवडणुकीत जर कुणी बंडखोरी केलीच तर नेत्यांसाठी पाच वर्षे दरवाजा बंद राहील. तसेच सर्वांवर करडी नजर आहे असं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. 

भंडारा : भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको, एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचं बटन दाबलं तर सत्यानाश होईल असं राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. जर कुणी बंडखोरी केलीच तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद होतील असा इशाराही त्यांनी दिला. तर भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत असं खळबळजनक वक्तव्यही बावनकुळे यांनी केलं. भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं. 

Chandrashekhar Bawankule On WhatsApp : सर्वांवर करडी नजर

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षात कुणी बंडखोरी केल्यास त्याचा फटका पक्षाला बसतो. एक चुकीचं बटन दाबल्यास देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ होईल. त्यामुळं चुकीचं बटन दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका. आता भंडाऱ्यातील सर्व मोबाईल आणि व्हाट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले असून सर्वांवर बारीक करडी नजर राहणार आहे." 

Chandrashekhar Bawankule Statement : तर पक्षाचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद 

पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना नेत्यांचे दरवाजे पाच वर्षासाठी बंद होईल असा इशारा बावनकुळे यांनी दिला. भंडारा भाजपच्या वतीने दिवाळी स्नेह मिलन सोहळ्याचा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बावनकुळे बोलत होते. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "नेत्यांनी विचार करावा. आवेशात, तिकीट न मिळाल्याच्या रागात आपण खडा तमाशा करतो. एक चुकीची बटन, एक चुकीची बंडखोरी पक्षाला नुकसानकारक ठरेल. एक नगरपालिका कमी झाली तर काही फरक पडणार नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारच्या योजनांचा यामुळे बट्ट्याबोळ होईल. आपल्या पक्षात एक जरी कार्यकर्त्यांनं बंडखोरी केली तरी, पक्षाच्या मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षासाठी बंद होईल, हे सर्वांनी लक्षात ठेवावं."

Chandrashekhar Bawankule Bhandara Speech : जेवढा पैसा लागेल तेवढा आणू

बावनकुळे पुढे म्हणाले की, "भंडारा, पवनी, तुमसर आणि साकोली या चारही जागा भाजपने लढवाव्यात. यासाठी 51 टक्क्यांची लढाई लढावी. भंडारा, पवनी, साकोली, तुमसरसाठी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा मी द्यायला तयार आहे. विधानसभेत आमदार निवडून आणण्यासाठी जेवढी ताकद लावली, त्यापेक्षा जास्त ताकद भंडारा जिल्ह्यातील चारही नगरपालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी लावणार आहे."

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget