एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दहा रुपयांच्या दारुच्या उधारीसाठी विक्रेत्याने एकास पेट्रोल टाकून जिवंत पेटवलं
बुलडाणा जिल्ह्यात दारुच्या उधारीच्या दहा रुपयासाठी दारु विक्रेत्याने एकास पेट्रोल टाकून जिवंत पेटविल्याची घटना घडली आहे.
बुलडाणा : जिल्ह्यातील दारूचे उधारीचे पैसे देत नसल्याच्या कारणावरून अवैध दारू विक्रेत्याने एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल (शनिवारी) मलकापूर तालुक्यातील ग्राम देवधाबा येथे रात्री नऊ वाजेदरम्यान घडली आहे.
तालुक्यात अवैध धंद्यावाल्यांनी डोकं वर काढले असून ग्राम देवधाबा मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत असून दारु विक्रेत्यांची ऊधारीचे पैसै वसुल करण्यासाठी जिवंत माणसाला जाळण्यापर्यंत मजल पोहचली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, देवधाबा येथील काशिनाथ राजाराम उगले (वय 45) हा गावातील अशोक गणपत भिसे यांचे घरी दारु पिण्यासाठी गेला होता. दारु मागितली असता यावेळी भिसे याने मागील ऊधारीचे दहा रुपये दे मग दारु देतो असे म्हटले असता दोघांत वाद झाला. अशोक भिसे याने घरात जाऊन प्लास्टीक बॉटलमध्ये पेट्रोल आणले व काशिनाथ राजाराम उगले याच्या अंगावर पेट्रोल टाकून माचिस लावुन पेटवुन दिले.
लॉकडाऊनच्या काळात हॉटेल कामगाराची आत्महत्या, एक ते दीड महिन्यांनंतर घटना उघड
आरोपी विरोधात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल
यात उगले गंभीर भाजले असून त्यास जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला याबाबतची तक्रार काशिनाथ राजाराम उगले याने ग्रामीण पोलिसांना दिली आहे. ग्रामीण पोलिसांनी अशोक भिसे यांचे विरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला. ग्रामीण पोलिसांनी अशोक भिसे यास अटक केली आहे, आज त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. उगले याची प्रकृती चिंताजनक असुन त्यास उपचारार्थ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव तायडे करीत आहे.
Rain News | सिंधुदुर्ग, सांगली, बुलढाणा औरंगाबादमध्ये मुसळधार; धबधबे प्रवाहित, रुग्णालयात पाणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
क्राईम
निवडणूक
Advertisement