एक्स्प्लोर
कार पार्किंगच्या वादातून शिवसेना शहरप्रमुखावर खुनी हल्ला
पुणे: सोसायटीच्या पार्किंगमध्ये गाडी लावण्यावरून झालेल्या वादात शिवसेनेच्या तळेगाव दाभाडे शहरप्रमुखावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तळेगाव येथे घडली.
सुनील उर्फ़ मुन्ना अर्जुन मोरे (वय-46, रा. लक्ष्मीबाग़ कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे हल्ल्यात जखमी झालेल्या शहरप्रमुखाचे नाव आहे. या प्रकरणी गणेश नरेंद्र तोडकर (वय-40, रा. लक्ष्मीबाग कॉलनी, तळेगाव दाभाडे) या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे हे शिवसेनेचे तळेगाव शहरप्रमुख आहेत. काल रात्री साडेनऊच्या सुमारास सोसायटीमध्ये गाडी लावण्याच्या कारणावरुन मोरे आणि त्यांचे शेजारी तोडकर यांच्यात वाद झाला. याच वादात चिडलेल्या तोड़कर याने चाकूने मोरे यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात मोरे यांच्या हातावर, छातीवर आणि पोटावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृति स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या हल्ल्यामागे कोणतेही राजकीय वैमनस्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement