एक्स्प्लोर

स्फोटक प्रकरण : जालन्यातील फार्म हाऊसची ATS कडून झडती

जालन्यातील भाजपचा माजी नगरसेवक आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेला खुशालसिंग ठाकूर याच्या मालकीच्या फार्म हाऊसवर ही धाड पडल्याने जालन्यात खळबळ उडाली आहे.

जालना : नालासोपार्‍यातील स्फोटकांची जप्ती आणि वैभव राऊतसह त्याच्या सहकार्‍यांच्या अटकेनंतर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्यांच्या रॅकेटची पाळेमुळे खोदण्यास सुरुवात केलेली आहे. श्रीकांत पांगारकरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आज दहशतवादविरोधी पथकाने जालन्यापासून 10 किमी अंतरावरील रेवगावातील जालन्याचा माजी नगरसेवक खूशालसिंग ठाकूरच्या फार्महाऊसवर धाड टाकली. याच फॉर्महाऊसवर पांगारकरने बॉम्बनिर्मिती, पिस्तूल चालवण्याचा सराव केल्याची माहिती चौकशीत अधिकार्‍यांना दिली होती. त्यानंतर त्याला सोबत घेऊनच दहशतवादविरोधी पथकाने ही धाडीची कारवाई केली. काल दुपारी पावणेतीन वाजता औरंगाबादेतून दहशतवाद विरोधी पथकाच्या सुमारे 50 अधिकारी व कर्मचार्‍यांची 5 वाहने या मोहीमेवर रवाना झाली होती. त्यांच्यासोबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेसह बॉम्बशोधक-नाशक पथक आणि श्‍वानपथकातील गौरी होती. स्फोटक प्रकरण : जालन्यातील फार्म हाऊसची ATS कडून झडती जालन्यातील भाजपचा माजी नगरसेवक आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेला खुशालसिंग ठाकूर याच्या मालकीच्या फार्म हाऊसवर ही धाड पडल्याने जालन्यात खळबळ उडाली आहे. जालन्याच्या स्थानिक राजकारणात पांगारकर, ठाकूर हे समविचारी मित्र असल्याची त्यांची ओळख आहे. दुपारी पावणेचार वाजता हे पथक रेवगावातील फार्महाऊसवर पोहोचले. तेथील एका विहिरीच्या परिसरासह दोन मजली आणि पाच खोल्यांचे बांधकाम असलेल्या इमारतीचीही त्यांनी झडती घेतली. या झडतीत पथकाने काय जप्त केले, याचा तपशिल मात्र लगेच समजू शकला नाही. जालन्यातील विश्रामगृहावर दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी खुशालसिंग ठाकूरला चौकशीसाठी बोलावले होते. स्फोटक प्रकरण : जालन्यातील फार्म हाऊसची ATS कडून झडती 2014 पूर्वी भाजपचा नगरसेवक असलेला खुशालसिंग ठाकूर सनातनचा साधक, जिल्ह्यात विश्‍व हिंदू परिषदेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी निगडीत असलेला व्यक्ती म्हणून त्याची त्या काळात ओळख होती. वैभव राऊतच्या कारस्थानाचा फायनान्सर श्रीकांत पांगारकर असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर आता दुसरी धाड पांगारकरच्या संदर्भाने व त्याने दिलेल्या माहितीवरुन जालना शहराजवळ पडल्याने पांगारकर आणि वैभव राऊतच्या कारस्थानामध्ये खुशालसिंग ठाकूरचा कितपत सहभाग आहे, ही नवी चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे. खुशालसिंग ठाकूरने 2014 सालात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढविली होती. सध्या अंदाजे 65 वर्ष वय असलेला खुशालसिंग ठाकूर यांची जालन्यातील राजूर रोड परिसरात 22 एकर बागायती शेती आहे. त्यांच्याच रेवगावच्या फार्महाऊसवर पांगारकरने बॉम्ब तयार केल्याचा खुलासा तपासात झाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने तेथे ही धाड टाकली. या धाडीच्या वेळी पथकाने श्रीकांत पांगारकरलाही सोबत नेले होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही झडती सुरु होती. या फार्महाऊसवरील शेळ्यांचा गोठा (गोटशेड) सुद्धा या कर्मचार्‍यांनी बराचवेळ तपासला होता. त्यानंतर रेवगावपासून 3 कि.मी. अंतरावरील सारवाडी ते पोकळवडगाव दरम्यान रेल्वे रुळाजवळच्या तलावात दडवलेले बॉम्ब निर्मितीचे साहित्यही या पथकाच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले. श्रीकांत पांगारकरने दिलेल्या माहितीवरुनच धाड टाकणार्‍या पथकाने या परिसरात तपासणी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Dhananjay Munde :  धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; सुरेश धसांकडून मागणीCity 60 : सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 20 Feb 2025 ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 20 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas PC : बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
India Vs Pakistan : तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
Embed widget