एक्स्प्लोर

IAS Transfer List : अस्तिक कुमार पांडे MMRDA चे नवे सहआयु्क्त, आर एस चव्हाण राज्य विमा योजनेच्या आयुक्तपदी; पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra IAS Transfer List : राहुल गुप्ता यांची छत्रपती संभाजीनगर वरुन हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी तर सत्यम गांधी यांची सांगली महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. 

मुंबई : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून आताही पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये वरिष्ठ आयएएस अधिकारी अस्तिक कुमार पांडे यांची एमएमआरडीएच्या सहआयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. तर आर एस चव्हाण यांची बदली कर्मचारी राज्य विमा योजनेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. 

राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून वरिष्ठ पातळीवरील प्रशासनात खांदेपालट सुरू झाला. त्यामध्ये आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या आधी 1 एप्रिल रोजी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आताही पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

Maharashtra IAS Transfer List : कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली? 

1. अस्तिक कुमार पांडे (IAS:RR:2011)- आयुक्त, कर्मचारी राज्य विमा योजना, मुंबई यांची MMRDA, मुंबई सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. आर.एस.चव्हाण (IAS:SCS:2013)- यांची नियुक्ती आयुक्त, कर्मचारी राज्य विमा योजना, मुंबई म्हणून करण्यात आली आहे.

3. राहुल गुप्ता (IAS:RR:2017) सह व्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर यांची जिल्हाधिकारी, हिंगोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4. सत्यम गांधी (IAS:RR:2021) प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची महापालिका आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. विशाल खत्री (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, राळेगाव उपविभाग, यवतमाळ यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आस्तिक कुमार पांडे हे मूळचे उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील आहेत. इतिहास विषयात एमए पदवी मिळवण्याबरोबरच त्यांनी टेक्नोलॉजी मिडीवल इंडिया या विषयामध्ये पीएचडीही केली आहे. त्यांनी UGC/JRF आणि NET देखील उत्तीर्ण केले आहे. त्याने UPSC CSE 2010 मध्ये पांडे यांनी 74 वा क्रमांक मिळवला. ते 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अस्तिक कुमार पांडे यांना झारखंड केडर देण्यात आले होते. मात्र आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर अस्तिक कुमार पांडे महाराष्ट्रात आले.

या आधी कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या? 

1. इंदुराणी जाखर - पालघर जिल्हाधिकारी

2. नेहा भोसले - रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी 

3. भारत बास्टेवाड - रोजगार हमी योजना, नागपूर 

4. राजेंद्र भारूड - अतिरिक्त विकास आयुक्त, उद्योग 

5. लक्ष्मी नारायण मिश्रा - जॉईन्ट एमडी, एमएसआरडीसी 

6. निधी पांडे - व्यवस्थापक संचालक, लघुउद्योग 

7. वैष्णवी बी - अतिरिक्त आयुक्त, नागपूर मनपा


ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी
'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी
Ajit Pawar NCP : दादांच्या पाठीमागे आमदारसाहेबांचा सर्वसामान्य कार्यकत्यांवर अन्याय का? पुण्यात झळकले बॅनर, नेमकं प्रकरण काय?
दादांच्या पाठीमागे आमदारसाहेबांचा सर्वसामान्य कार्यकत्यांवर अन्याय का? पुण्यात झळकले बॅनर, नेमकं प्रकरण काय?
Nashik Crime News: कायद्याचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या नाशिक पोलिसांना रोडरोमिओंचं चॅलेंज, रनिंगला गेलेल्या तरुणीची टवाळखोराने काढली छेड, सोशल मिडियावर सांगितली आपबिती
कायद्याचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या नाशिक पोलिसांना रोडरोमिओंचं चॅलेंज, रनिंगला गेलेल्या तरुणीची टवाळखोराने काढली छेड, सोशल मिडियावर सांगितली आपबिती
Maharashtra Live blog updates: रोहित पवारांनी दावा केलेल्या इराक आणि इराण प्रकरणाची एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्टी
Maharashtra Live blog updates: रोहित पवारांनी दावा केलेल्या इराक आणि इराण प्रकरणाची एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्टी

व्हिडीओ

Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2026 Live Updates : अर्थसंकल्पापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु, लाईव्ह अपडेटस एका क्लिकवर
Maharashtra Budget 2026 Live Updates : अर्थसंकल्पापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु, लाईव्ह अपडेटस एका क्लिकवर
Share Market Fall : शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण
शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
Vasant More: सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Pawar and Eknath Shinde: होय, त्यावेळी इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता; एकनाथ शिंदेंनी कबुली दिल्याचा रोहित पवारांचा दावा
होय, त्यावेळी इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता; एकनाथ शिंदेंनी कबुली दिल्याचा रोहित पवारांचा दावा
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
Embed widget