एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीवेळी विचारली जातेय शेतकऱ्यांची जात
ऑनलाईन नोंदणी करताना जातीचा उल्लेख हा रकाना रद्द करण्यात यावा. यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या जात आहे, अशी मागणी शेतकर्यांतून केली जाते आहे.
![तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीवेळी विचारली जातेय शेतकऱ्यांची जात asked Hingoli Farmers caste in register online for purchase of toor तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीवेळी विचारली जातेय शेतकऱ्यांची जात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/15081522/farmers-loan-waiver.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हिंगोली : तूर आणि हरभरा खरेदीसाठी सुरु असलेल्या ऑनलाईन नोंदणीवेळी चक्क शेतकऱ्यांची जात विचारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या जात असून शेतकर्यातून संताप व्यक्त केला जात आहे. जातीचा उल्लेख असलेला कारखाना रद्द करण्याची मागणी शेतकर्यांतून केली जात आहे
नाफेडकडून हमीभावाने हरभरा आणि तूर खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. ही ऑनलाईन नोंदणी करत असताना शेतकऱ्याला चक्क त्यांची जात विचारली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या जात असून शेतकर्यातून संताप व्यक्त केला जात आहे. जातीचा उल्लेख असलेला कारखाना रद्द करण्याची मागणी शेतकर्यांतून केली जाते आहे.
जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजा काळ्या आईची सेवा करून जगाच पोट भरतो. शेतातून निघणाऱ्या अन्नाच्या दाण्यावर खाणाऱ्याचं नाव नसतं. परंतु शेतकरी आपलं अन्न कुण्या एका जाती धर्मासाठी नाही तर अखंड मानव धर्मासाठी निर्मिती करतो. त्याच शेतकऱ्याला त्यानेच पिकवलेला शेतमाल शासनाला विकताना मात्र त्याची जात विचारून शेतकऱ्याला अपमानित करण्याचा निंदनीय प्रकार चक्क शासनाच्याच नाफेड या हमीभाव खरेदी यंत्रणेमार्फत सुरु आहे.
एकीकडे शासन जातीभेद निर्मुलनासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून जनजागृती करत आहे. परंतु शासनाचीच एक यंत्रणा जर अशाप्रकारे जातीचा उल्लेख करून शेतकऱ्याचा माल खरेदी करत असेल तर खरंच हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार आहे का? असा सवाल केला जात आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला. हमीभावानं जी तूर आणि हरभरा खरेदी होते. त्याचे चुकारे मिळायला कधी महिनाभर तर कधी दोन दोन महिने शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते. आणि त्यातच हा असा भावना दुखावण्याचा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)