Ashadhi Wari 2022 : संत मुक्ताईची पालखी आज पाथरवाला मुक्कामी; तर गजानन महाराजांच्या पालखीचा आज दैठणा येथे मुक्काम
Ashadhi Wari 2022 : आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील ठिकठिकाणांहून पालखीचे प्रस्थान झाले आहे. संत गजानन महाराज, संत मुक्ताई यांची पालखी आज कोणत्या ठिकाणी मुक्काम असणार आहे हे जाणून घ्या.
![Ashadhi Wari 2022 : संत मुक्ताईची पालखी आज पाथरवाला मुक्कामी; तर गजानन महाराजांच्या पालखीचा आज दैठणा येथे मुक्काम ashadhi wari 2022 ashadhi ekadashi pandharpur sant muktai stays at patharwala and sant gajanan maharaj palkhi stays at daithana Ashadhi Wari 2022 : संत मुक्ताईची पालखी आज पाथरवाला मुक्कामी; तर गजानन महाराजांच्या पालखीचा आज दैठणा येथे मुक्काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/21/51ca4d24caa73418dfda539a5edb8513_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ashadhi Wari 2022 : कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 6 जूनला गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं. तर, 3 जूनला संत मुक्ताईचा आणि रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा सुरु झाला. पालखीचा हा मुक्काम आज नेमका कुठे असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज दैठणा येथे मुक्काम
शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून संत गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे. 6 जूनला शेगाव येथून ही पालखी निघाली. भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पालखीचा आजचा मुक्काम दैठणा या ठिकाणी असणार आहे. उद्या पालखी खळी येथून प्रस्थान करेल. तर, रात्री पालखीचा मुक्काम गंगाखेड येथे असणार आहे.
माता रूक्मिणीच्या पालखीचा आज कण्हेरगाव श्री. हटकेश्वर देवस्थान, जिल्हा हिंगोली येथे मुक्काम
माता रूक्मिणीच्या पालखीची सुरुवात 3 जून रोजी सुरु झाली. हा पालखी सोहळा कौंडण्यपूर येथून प्रस्थान करण्यात आला. त्यानुसार आज रात्री श्री. हटकेश्वर देवस्थान, जिल्हा हिंगोली येथे मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच बुधवारी 22 जून रोजी ही पालखी सकाळी श्री. हटकेश्वर देवस्थान, जि. हिंगोली येथून प्रस्थान करेल. तर, रात्री रोडकेश्वर मंदिर संस्थान, जिल्हा परभणी येथे मुक्काम. येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.
संत मुक्ताईच्या पालखीचा आज पाथरवाला येथे मुक्काम
यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे 3 जूनपासून प्रस्थान झाले. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजेच समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला आहे. त्यानुसार आज पालखी पाथरवाला मुक्कामी असणार आहे. उद्या म्हणजेच बुधवारी 22 जून रोजी ही पालखी खळी येथे प्रस्थान करेल, तर रात्रीचा मुक्काम गंगाखेड या ठिकाणी असणार आहे.
संत निवृत्तीनाथ पालखीचा आज बेलापूर (बु.) येथे मुक्काम
संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळा 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी निघाला. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली पालखी आज खंबाळे मुक्कामी असणार आहे. तर, उद्या म्हणजेच 22 जून रोजी पालखी सकाळी राजुरीहून प्रस्थान करेल. त्यानंतर रात्री बेलापूर (बु.) येथे पालखीचा रात्रभर मुक्काम असणार आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मनसोक्त विठुरायाचे पाहता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)