एक्स्प्लोर
Advertisement
परळीतील जवान महेश तिडके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पंजाब मधल्या भटिंडा भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असताना अपघातात परळीतील जवान महेश तिडके यांना वीरमरण आलं. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बीड : नवीन वर्षाच्या सुरवातीलाच भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असताना अपघातात परळीतील सुपुत्राला वीरमरण आले. ही घटना पंजाब मधल्या भटिंडा येथे घडली असून याच बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील लाडझरी इथल्या महेश यशवंत तिडके या जवानाला विरमरण आलं. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
महेश तिडके हे 2015 मध्ये सैन्यात दाखल झाले होते. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी महेश तिडके यांचा विवाह झाला होता. महेश तिडके 7010 बटालियन भटिंडा पंजाब मध्ये सैन्यात कार्यरत होते. 19 डिसेंबरला भटिंडा येथे कर्तव्यावर असताना समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाने महेश यांना जोराची धडक दिली. या धडकेत महेश गंभीर जखमी झाले. त्यांनतर त्यांना भटिंडा येथील हे रुग्णालयात उपचार करण्यात आले. 11 दिवस महेश यांच्यावरती उपचार चालू होते, मात्र उपचारादरम्यान महेश तिडके याचा मृत्यू झाला.
महेश यांच्या मृत्यूची वार्ता लाडझरी परिसरात पोहोचल्यानंतर या संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. महेश यांच्या पश्चात त्याचे आई-वडील पत्नी दोन बहिणी असा परिवार आहे. विशेष म्हणजे महेश यांचा मोठा भाऊसुद्धा सैन्यामध्ये जम्मू येथे कार्यरत आहे.
या घटनेवर परळीचे पुत्र आणि महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडेंनी 'शहीद महेश तिडके यांना श्रद्धांजली वाहत आपले बलिदान सदैव स्मरणात राहिल', असं ट्विट केलं आहे. यात त्यांनी 'पंजाबमधील भटिंडा येथे कर्तव्यावर असताना परळी तालुक्यातील लाडझरीचे जवान महेश यशवंत तिडके यांना वीरमरण आले. शहीद महेश तिडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देशासाठीचे तुमचे बलिदान आम्ही नेहमी स्मरणात ठेवू' अस म्हटलं आहे.
दरम्यान बुधवारी सकाळी नौशेरा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत शोघमोहीम सुरू केली. त्याचदरम्यान, लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. यामध्ये महाराष्ट्राच्या नाईक संदीप रघुनाथ सावंत यांचा समावेश होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement