भाजपमध्ये जाण्यासाठी किती खोके घेतले? खोतकरांचा गोरंट्याल यांना सवाल, म्हणाले, भाजप काय साध्य करणार?
जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल ( Kailash Gorantyal) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशावर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी टीका केली.

Arjun Khotkar : जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल ( Kailash Gorantyal) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशावर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी टीका केली आहे. तसेच या प्रवेशावरुन त्यांना भाजपला (BJP) सवालही केला आहे. आमच्या मित्र पक्षाने विचार करायला हवा होता. अशी लोक घेऊन भाजप काय साध्य करत आहे? असा सवाल खोतकरांनी केला. ज्यांच्याकडे जनाधार राहिला नाही, अशा लोकांना घेऊन भाजप काय साध्य करु इच्छित असल्याचे ते म्हणाले. कदाचित भाजप नेत्यांना कैलास गोरंट्याल यांनी केलेले घोटाळे माहिती नसतील असे खोतकर म्हणाले.
तुझ्यात खूमखुमी असेल तर पुन्हा ये
दरम्यान, याबाबत आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गोष्ट मांडलेली आहे ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे चर्चा करतील. तुमची बायको पाच वर्षे नगरपालिकेची अध्यक्ष राहिलेली आहे त्यांना निवडून दिलेल आहे, मग तुम्हाला टीका सहन करावी लागेल. यामुळे त्यांचा भ्रष्टाचार लपणार नाही असे खोतकर म्हणाले. तुझी मस्ती आम्ही दहा-वेळा जिरवली आहे, तुझ्यात खूमखुमी असेल तर पुन्हा ये. तुला साध्या सोसायटीच्या निवडणुकीत आम्ही पाडल्याचे खोतकर म्हणाले.
ज्या लोकांनी तुला मतदान केलं त्यांना तू गद्दार झाला
ज्या लोकांनी तुला मतदान केलं त्यांना तू गद्दार झाल्याचे खोतकर म्हणाले. भाजपमध्ये जायचे याने किती खोके घेतले ? असा सवाल देखील खोतकरांनी गोरंट्याल यांना केलाय. या प्रवेशा पाठीमागे कोण आहे त्यांना काही दिवसांनी आम्ही उघड करु. हे स्थानिक षडयंत्र आहे, स्थानिक लोकांनीच त्यांना उचकवलं आहे.. माझ्याकडे त्याच्या भावाची रेकॉर्डिंग आहे. तो आई बद्दल बोललेला आहे, त्यांने आईला किती यातना दिल्या, याची माझ्याकडे क्लिपआहे ती योग्य वेळी काढू असे खोतकर म्हणाले.
भाजपमध्ये जायचे किती खोके घेतले ?
काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना भाजपने प्रवेश दिल्यानंतर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपच्या युती धर्मावरती सवाल उपस्थित केलाय. ज्यांच्याकडे जनाधार राहिला नाही अशा लोकांना घेऊन भाजप काय करू इच्छिते असा सवाल करत, आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे ही गोष्ट मांडलेली असल्यास अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये जायचे किती खोके घेतले असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान येणाऱ्या काळामध्ये गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशा मागे कोण आहे त्याला लवकरच उघड करु असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
























