एक्स्प्लोर
Advertisement
जालन्यात दानवेंविरोधात उभा राहून मीच जिंकणार : अर्जुन खोतकर
अर्जुन खोतकरांनी मात्र युती झाली, तरीही शंभर टक्के मी जालन्यातून उभा राहणार आणि विजयीच होणार, असं ठणकावून सांगितलं. लोक ज्यांच्या पाठीशी असतात, ते विजयी होतात, असं खोतकर म्हणाले.
नाशिक : शिवसेना नेते आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात शड्डू ठोकला आहे. जालन्यात दानवेंना पराभूत करण्याचा निर्धार खोतकारांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही, याबाबत अद्याप कुठलीच स्पष्टता नाही. कधी शिवसेनेकडून स्वबळाची भाषा होते, तर कधी संजय राऊत 'मोठा भाऊ किंवा वडील' अशा बदलत्या भूमिकेत जात युतीचे संकेत देतात. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीसांनीही 'भाजप लाचार नाही, पण युतीला तयार आहे' असं म्हणत हात पुढे केला आहे.
अर्जुन खोतकरांनी मात्र युती झाली, तरीही शंभर टक्के मी जालन्यातून उभा राहणार आणि विजयीच होणार, असं ठणकावून सांगितलं. लोक ज्यांच्या पाठीशी असतात, ते विजयी होतात, असं खोतकर म्हणाले. नाशिकमध्ये डोंगरे वसतिगृह मैदानावरील कृषि महोत्सव 2019 च्या कार्यक्रमानंतर बोलताना खोतकरांनी निर्धार व्यक्त केला.
इतकी वर्ष भाजप आमच्या ताकदीवर निवडून येत आली. भाजपची वागणूक खूप क्लेशदायक आहे. त्यांना खूप घमेंड आहे, मस्ती आहे आणि ती मी उतरवणार, असा चंग अर्जुन खोतकरांनी बांधला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement