(Source: ECI/ABP News/ABP Majha)
coronavirus | धुळे जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरुपात सातशे विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती
सध्याची जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता शहरी, ग्रामीण भागात सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर अंकुश राहावा यासाठी 700 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धुळे : धुळे जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा तीव्र होत असल्यानं प्रशासकीय यंत्रणा अधिक सावध झाली आहे. नागरिकांनी देखील प्रशासनाच्या आवाहनाला, प्रशासनाच्या सुचनांचं पालन करून सहकार्य करावं अशी अपेक्षा प्रशासनाला आहे .मात्र सध्याची जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता शहरी, ग्रामीण भागात सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर अंकुश राहावा यासाठी 700 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्याची परिस्थिती पोलीस, जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी अवगत व्हावी या उद्देशाने त्याचप्रमाणे बॉम्बे पोलीस अॅक्ट कलम 21 नुसार पोलीस अधीक्षकांना विशेष परिस्थितीत नियुक्ती करावयाच्या अधिकारानुसार तात्पुरत्या स्वरूपात सातशे विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त करण्यात आलेल्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांमध्ये साधारण 50 माजी सैनिक आहेत .यासाठी अर्ज धुळे पोलीस विभागाकडे आले होते .
शनिवारी (25 एप्रिल) पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या हस्ते या विशेष पोलीस अधिकाऱ्यांना ओळख पत्र देण्यात आले. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी या सातशे विशेष पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. यामध्ये या विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेशी सौजन्याने वागायचं, कोणालाही मारहाण करायची नाही, ओळख पत्राचा गैरवापर होणार नाही याबाबत दक्षता घ्यायची आहे .पोलीस विभागातर्फे वेळोवेळी पारित होणाऱ्या सूचना, आदेशाचा भंग होणार नाही, याबाबत दक्ष राहायचं आहे, असं देखील या नव्या सातशे विशेष पोलीस अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :