एक्स्प्लोर
...तर 'पद्मभूषण' पुरस्कार परत करणार : अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज अण्णांची भेट घेतली. त्यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाहीय.
अहमदनगर : 8 किंवा 9 तारखेपर्यंत सरकारने लोकपाल नियुक्तीबाबत निर्णय घेतला नाही तर पद्मभूषण पुरस्कार परत करणार, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला दिलाय. कायदा होऊन 5 वर्षे झाली तरी सरकार लोकपाल नेमायला तयार नाही. लोकपालची नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका अण्णांनी घेतली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज अण्णांची भेट घेतली. त्यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाहीय. अण्णा हजारे आणि गिरीश महाजन यांच्यात सुमारे तासाभरापासून त्यांनी अण्णांसोबत चर्चा केली. तर दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही राणेगणसिद्धीत दाखल झाले. या दोघांनीही अण्णांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
अण्णा हजारे आणि गिरीश महाजन यांच्यात झालेल्या चर्चेत अण्णांनी केलेल्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलं. मात्र, लोकपाल नियुक्तीबाबत अण्णा आग्रही आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी अण्णांचं बोलणं करुन दिल्याचंही महाजनांनी सागितलं.
लोकपाल आणि लोकायुक्त नेमणुकीच्या संदर्भातल्या मागण्या पूर्ण करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. तुम्ही आश्वासन देऊन चालणार नाही अशी भूमिका अण्णा हजारेंनी घेतली होती. दरम्यान, अण्णांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृतीही ढासळली असून, त्यांनी तातडीनं उपोषण सोडायला हवं. नाहीतर अण्णांची तब्येत अजून बिघडू शकते असा इशारा डॉक्टरांनी दिलाय.
दुसरीकडे राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी अण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ नगर- पुणे महामार्गावर सुपा येथे रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले. यावेळी नागरिकांनी सरकारचा निषेध केला.
लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती, स्वामिनाथन आयोग, शेतमालास दीडपट हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. यामुळे अण्णांची प्रकृती ढासळली आहे. अण्णा हजारेंच्या यकृतावर परिणाम झाला आहे. तसंच रक्तदाबाचाही त्रास होऊ लागला आहे. उपोषण सुरुच राहिलं तर किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. याशिवाय त्यांचे 3.5 किलो वजन कमी झाले आहे. उपोषण सुरूच ठेवले तर त्यांच्या किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
केंद्रात लोकपालचा निर्णय घेण्याची मागणी
राज्यात लोकयुक्ताचा निर्णय झाला असला तरी केंद्रात लोकपालचा निर्णय घेण्याची मागणी करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. लोकायुक्ताबाबत सरकारनं अधिवेशनाची वाट न पाहता अध्यादेश काढावा, लोकपाल नेमावा तसंच शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा यांसारख्या मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement