एक्स्प्लोर
लोकायुक्ताबाबत अध्यादेश काढा, अण्णा हजारे आंदोलनावर ठाम
आंदोलनापूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांची भेट घेणार आहेत. त्यात अण्णांची समजूत काढण्याचा प्रयत्न होईल. दरम्यान त्याआधी लोकायुक्त, उपलोकायुक्त अधिनियमात सुधारणेला मंजुरी दिल्यानंतर आता लोकायुक्त मुख्यमंत्र्यांचीही इन कॅमेरा चौकशी करु शकणार आहेत.
अहमदनगर : लोकायुक्त नेमण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतरही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. लोकायुक्ताबाबत सरकारनं अधिवेशनाची वाट न पाहता अध्यादेश काढावा, लोकपाल नेमावा तसंच शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा यांसारख्या मागण्यांसाठी अण्णा आज उपोषणाला बसणार आहेत.
राळेगणसिद्धीमधील यादव बाबा मंदिरात अण्णा उपोषणाला सुरूवात करतील. त्याआधी आंदोलनापूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांची भेट घेणार आहेत. त्यात अण्णांची समजूत काढण्याचा प्रयत्न होईल. दरम्यान त्याआधी लोकायुक्त, उपलोकायुक्त अधिनियमात सुधारणेला मंजुरी दिल्यानंतर आता लोकायुक्त मुख्यमंत्र्यांचीही इन कॅमेरा चौकशी करु शकणार आहेत.
मुख्यमंत्री आता लोक आयुक्तांच्या कार्यकक्षेत
राज्याच्या लोक आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री या पदाचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासोबतच लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त यांच्या नेमणुकीत सर्व समावेशकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम-1971 नुसार लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त यांची निर्मिती करण्यात आली. अशी पदे निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. या अधिनियमाच्या तरतुदीनुसार लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय स्थापित झाले असून 25 ऑक्टोबर 1972 पासून या कार्यालयाच्या कामकाजास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाने किंवा शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या किंवा महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच शासनाच्या मालकीची किंवा नियंत्रणाखालील महामंडळे, कंपन्या यासारख्या काही प्राधिकारी संस्थातर्फे करण्यात आलेल्या प्रशासकीय कार्यवाही संबंधिच्या जनतेच्या गाऱ्हाण्यांची आणि लाचलुचपत अभिकथनाच्या तक्रारींची चौकशी या अधिनियमाच्या तरतुदीनुसार लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांना करता येते. मात्र, त्यात मुख्यमंत्री या पदाचा समावेश नव्हता.
केंद्र शासनाचा लोकपाल आणि लोक आयुक्त अधिनियम-2013 संमत करण्यात आला आहे. केंद्रीय लोकपाल अधिनियमातील तरतुदी विचारात घेऊन राज्याच्या महाराष्ट्र लोक आयुक्त व उप लोक आयुक्त अधिनियम-1971 मध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याचा प्रस्ताव आज सादर करण्यात आला. या सुधारणेंमुळे लोक आयुक्त अधिक सक्षम होणार आहे. तसेच याची कार्यकक्षा वाढून तो अधिक प्रभावी ठरणार आहे. यासोबतच लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्या नेमणुकीसाठी शिफारस करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्याची तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे.
या समितीत विधानसभेचे अध्यक्ष, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अथवा त्यांनी नियुक्त केलेले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राज्यपाल नियुक्त विधिज्ञ अशा चार सदस्यांचाही समावेश असेल. तसेच नियुक्ती करण्याच्या दृष्टीने सहाय्य करण्यासाठी विविध क्षेत्रातील नामांकित सात सदस्यांची एक सर्च कमिटी देखील स्थापन करण्याच्या तरतुदीचा देखील समावेश करण्यात आला आहे. या समितीत लोकप्रशासन, विधि, धोरण, लाच-लुचपत प्रतिबंध, वित्त व व्यवस्थापन आदी क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर तसेच विविध मागासवर्ग संवर्गातील प्रतिनिधी समाविष्ट असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement