एक्स्प्लोर

Animal census: अवकाळी पावसाचे प्राणी गणनेवर विरजण; बुद्ध पौर्णिमेला बोर, उमरेड आणि नागझिरा अभयारण्यात करण्यात येणारी प्राणी गणना रद्द

Animal census: ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात होणारी प्राणी गणना वनविभागाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Animal census: अभयारण्यामध्ये वर्षभरात वन्य प्राण्यांची संख्या वाढली की कमी झाली, मानवी हस्तक्षेपामुळे प्राण्यांच्या संख्येवर कोणता परिणामा झाला आहे का?  कोणत्या प्राण्यांची संख्या कमी होत आहे  अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे दर वर्षी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राण्यांची गणना केली जाते.  मात्र यंदा या गणनेला अवकाळीचा फटका बसला असून  शुक्रवारी (5 मे) होणारी प्राणी गणना (Animal Cnsus)  रद्द करण्यात आली आहे. 

बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून दरवर्षी प्राणी गणना करण्यात येते. यंदा ही प्राणी गणना 5 मे ला  होणार होती. मात्र  6 मे पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज सोबतच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात होणारी प्राणी गणना वनविभागाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी अभयारण्यत प्राणी गणना करण्यात येते. या प्राणी गणनेसाठी वन्यजीव प्रेमींसाठी ऑनलाईन बुकिंगची सोय करण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे प्राणी गणना रद्द करण्यात आली आहे. 

 बोर,उमरेड आणि नागझिरा या अभयारण्यातील मचाणवर करण्यात येणारी प्राणी गणना रद्द करण्यात आली आहे. या अभयारण्यात मचाणवरील प्राणी गणनेसाठी 109 वन्यजीव प्रेमींनी जंगलातील 55 मचाणासाठी ऑनलाईन बुकिंग केली होती. दर वर्षी सर्वाधिक प्रकाश असलेल्या रात्री म्हणजेच बुद्धपौर्णिमेला पाणवठ्यावर बसून, तसेच ठशांचा अभ्यास करून वन्य प्राण्यांची गणना केली जाते.  पारपंरिक वन्यप्राणी गणनेविषयी प्राणीप्रेमींना खूप आकर्षण आहे.   यातून मिळणारी वन्य प्राण्यांची आकडेवारी अचूक नसली, तरी नव्याने दाखल झालेला वन्य प्राणी अथवा कमी झालेल्या एखाद्या प्राण्याविषयी मिळालेली माहिती नक्कीच उपयोगी ठरते 

राज्यातील वाघांच्या संख्येत 25 टक्क्यांची वाढ 

राज्यात गेल्या चार वर्षांत वाघांच्या संख्येत 25 टक्यांनी वाढ झाली आहे. दर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत व्याघ्र प्रकल्पांचे व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकन केले जाते. 2022मध्ये झालेल्या या  मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशात आठव्या क्रमांकावर आला आहे. अन्य व्याघ्र प्रकल्पांचा मूल्यांकन दर्जा देखील वाढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याबद्दल शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.  राज्यात सुमारे 400 हून अधिक वाघ आहे.

संबंधित बातम्या :

मानव-वन्यजीव संघर्ष थांबवण्यासाठी जंगल आणि गावांमध्ये आभासी भिंत, ताडोबा प्रशासनाचा अनोखा प्रयोग 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Embed widget