एक्स्प्लोर

रामदेव बाबांच्या 'कोरोना किट'ला महाराष्ट्रात विक्रीची परवानगी नाही : अनिल देशमुख

रामदेव बाबांच्या पतंजलीकडून निर्माण केलेल्या कोरोनिल आणि श्वासारी या कोरोना किटला महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. याआधी राजस्थान सरकारने या औषधावर बंदी घातली आहे. पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे.

मुंबई : रामदेव बाबांच्या पतंजलीकडून निर्माण केलेल्या कोरोनिल आणि श्वासारी या कोरोना किटला महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. याआधी राजस्थान सरकारने या औषधावर बंदी घातली आहे. पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे. या औषधाबाबत जयपूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सर्व तपासणी करत आहे. योगी रामदेव यांना बनावट औषधांच्या विक्रीला महाराष्ट्रात परवानगी मिळणार नाही असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनावरचं औषध असा दावा करणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेला नेमकं हे प्रमाणपत्र दिलं कुणी असा प्रश्न पडला आहे. केंद्र सरकारनं तर पतंजलीकडून सगळी कागदपत्रं मागवली आहेतच, पण ज्या उत्तराखंड सरकारच्या आयुर्वेद मंत्रालयाच्या लायसन्सनंतर हा सगळा दावा केला जात होता, त्यांनीही याबाबत काल धक्कादायक विधान केलं आहे. बाबा रामदेव यांच्या औषधाला आम्ही परवानगी दिली, पण ते औषध केवळ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, ताप आणि खोकल्यावर उपाय म्हणून आम्हाला परवानगी मागितली होती, त्यात कोरोनाचा कुठलाही उल्लेख नव्हता असं उत्तराखंडच्या आयुर्वेदिक औषध परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून कागदपत्रं मिळाल्याचा मेल आल्यानंतर आचार्य बालकृष्णन यांनी हा वाद मिटल्याचं म्हटलं होतं. कोरोना संसर्गावरील औषधावरुन पतंजली नव्या वादात, कोरोना किट लाँच करेपर्यंत आयुष मंत्रालयाला माहिती नसल्याचं स्पष्ट बालकृष्णन यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना बाबा रामदेव यांनी त्यावर आयुर्वेदाचा विरोध आणि द्वेष करणाऱ्यांसाठी निराशापूर्ण बातमी असं म्हटलं आहे. मात्र जी कागदपत्रं या ट्विटमध्ये आहेत, त्यात कुठेही औषधाचं व्हेरिफिकेशन झाल्याचं अजून म्हटलेलं नाहीय. काल हा सगळा वाद सुरु झाल्यानंतर आचार्य बालकृष्णन यांनी जे पत्र लिहिले होतं, ते मिळाल्याचं आयुष मंत्रालयाच्या या पत्रात म्हटलं आहे. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी एका वाहिनाशी बोलताना बाबा रामदेव यांनी मंत्रालयाच्या परवानगीशिवाय हे औषध बाजारात आणायला नको होतं अशी प्रतिक्रिया दिली होती. सगळी कागदपत्रं आम्ही त्यांच्याकडून मागितली आहेत. हा विषय आयुष मंत्रालयाच्या टास्क फोर्सकडे सोपवण्यात आला आहे. सर्व परीक्षण झाल्यानंतरच याबाबतीतला निर्णय जाहीर होईल. पतंजलीच्या कोरोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आयुष मंत्रालयाचे आदेश पतंजलीने तयार केलेल्या औषधामध्ये घटकांची मात्रा नेमकी कशाप्रकारे आहे. कुठल्या हॉस्पिटलमध्ये, कुठल्या साईटवर हे परीक्षण करण्यात आलं याची माहिती मागवण्यात आली आहे. औषधाच्या शोधातले प्रोटोकॉल, सॅम्पल साईज, काही आवश्यक प्रमाणपत्रं या सगळ्याची मााहिती मंत्रालयानं मागवली आहे. हरिद्वारमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांनी कोरोनिल आणि श्वासारी या नावानं दिव्य कोरोना किट लॉन्च केलं होतं. माईल्ड ते मॉडरेट कोरोना पेशंट 3 ते 7 दिवसांत यानं बरे होतात असा दावाही त्यांनी केला होता. हे औषध 100 टक्के गुणकारी असल्याचाही दावा त्यांनी केला'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget