एक्स्प्लोर

कोरोना संसर्गावरील औषधावरुन पतंजली नव्या वादात, कोरोना किट लाँच करेपर्यंत आयुष मंत्रालयाला माहिती नसल्याचं स्पष्ट

बाबा रामदेव यांच्या औषधाला आम्ही परवानगी दिली, पण ते औषध केवळ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, ताप आणि खोकल्यावर उपाय म्हणून आम्हाला परवानगी मागितली होती, त्यात कोरोनाचा कुठलाही उल्लेख नव्हता असं उत्तराखंडच्या आयुर्वेदिक औषध परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : कोरोनावरचं औषध असा दावा करणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेला नेमकं हे प्रमाणपत्र दिलं कुणी असा प्रश्न कालपासून पडलेला आहे. केंद्र सरकारनं तर पतंजलीकडून सगळी कागदपत्रं मागवली आहेतच, पण ज्या उत्तराखंड सरकारच्या आयुर्वेद मंत्रालयाच्या लायसन्सनंतर हा सगळा दावा केला जात होता, त्यांनीही याबाबत आज धक्कादायक विधान केलं आहे. बाबा रामदेव यांच्या औषधाला आम्ही परवानगी दिली, पण ते औषध केवळ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, ताप आणि खोकल्यावर उपाय म्हणून आम्हाला परवानगी मागितली होती, त्यात कोरोनाचा कुठलाही उल्लेख नव्हता असं उत्तराखंडच्या आयुर्वेदिक औषध परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून कागदपत्रं मिळाल्याचा मेल आल्यानंतर आचार्य बालकृष्णन यांनी हा वाद आता मिटल्याचं म्हटलं आहे.

बालकृष्णन यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना बाबा रामदेव यांनी त्यावर आयुर्वेदाचा विरोध आणि द्वेष करणाऱ्यांसाठी निराशापूर्ण बातमी असं म्हटलं आहे. मात्र जी कागदपत्रं या ट्विटमध्ये आहेत, त्यात कुठेही औषधाचं व्हेरिफिकेशन झाल्याचं अजून म्हटलेलं नाहीय. काल हा सगळा वाद सुरु झाल्यानंतर आचार्य बालकृष्णन यांनी जे पत्र लिहिले होतं, ते मिळाल्याचं आयुष मंत्रालयाच्या या पत्रात म्हटलं आहे. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी एका वाहिनाशी बोलताना बाबा रामदेव यांनी मंत्रालयाच्या परवानगीशिवाय हे औषध बाजारात आणायला नको होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. सगळी कागदपत्रं आम्ही त्यांच्याकडून मागितली आहेत. हा विषय आयुष मंत्रालयाच्या टास्क फोर्सकडे सोपवण्यात आला आहे. सर्व परीक्षण झाल्यानंतरच याबाबतीतला निर्णय जाहीर होईल.

कुठल्या गोष्टींची माहिती मंत्रालयानं मागवली आहे

पतंजलीने तयार केलेल्या औषधामध्ये घटकांची मात्रा नेमकी कशाप्रकारे आहे. कुठल्या हॉस्पिटलमध्ये, कुठल्या साईटवर हे परीक्षण करण्यात आलं याची माहिती मागवण्यात आली आहे. औषधाच्या शोधातले प्रोटोकॉल, सॅम्पल साईज, काही आवश्यक प्रमाणपत्रं या सगळ्याची मााहिती मंत्रालयानं मागवली आहे. काल हरिद्वारमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांनी कोरोनिल आणि श्वासारी या नावानं दिव्य कोरोना किट लॉन्च केलं होतं. माईल्ड ते मॉडरेट कोरोना पेशंट 3 ते 7 दिवसांत यानं बरे होतात असा दावाही त्यांनी केला होता. हे औषध 100 टक्के गुणकारी असल्याचाही दावा त्यांनी केला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर साधू-महंतांमधील वाद शिगेला; नेमकं काय घडलं?
कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर साधू-महंतांमधील वाद शिगेला; नेमकं काय घडलं?
Prashant Koratkar : शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापुरकर यांच्याही बेकायदेशीर बाबींची चौकशी करुन बुलडोजर चालवा; कोणी केली मागणी?
'शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापुरकर यांच्याही बेकायदेशीर बाबींची चौकशी करुन बुलडोजर चालवा'
Sanjay Raut : महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभला, कुणाल कामरा प्रकरणावर राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ही गांXXX
महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभला, कुणाल कामरा प्रकरणावर राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ही गांXXX
ऑफिसमधील फुकटची कॉफी पिण्यापूर्वी 'या' धोक्याबद्दल जाणून घ्या
ऑफिसमधील फुकटची कॉफी पिण्यापूर्वी 'या' धोक्याबद्दल जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Kunal Kamra : कुणाल कामराने एकनाथ शिंदेंची माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630AM 24 March 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सNagpur Fahim Khan Home Demolished : नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझरABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 24 March 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर साधू-महंतांमधील वाद शिगेला; नेमकं काय घडलं?
कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर साधू-महंतांमधील वाद शिगेला; नेमकं काय घडलं?
Prashant Koratkar : शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापुरकर यांच्याही बेकायदेशीर बाबींची चौकशी करुन बुलडोजर चालवा; कोणी केली मागणी?
'शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापुरकर यांच्याही बेकायदेशीर बाबींची चौकशी करुन बुलडोजर चालवा'
Sanjay Raut : महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभला, कुणाल कामरा प्रकरणावर राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ही गांXXX
महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभला, कुणाल कामरा प्रकरणावर राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ही गांXXX
ऑफिसमधील फुकटची कॉफी पिण्यापूर्वी 'या' धोक्याबद्दल जाणून घ्या
ऑफिसमधील फुकटची कॉफी पिण्यापूर्वी 'या' धोक्याबद्दल जाणून घ्या
Video : झुठा हूँ मैं, पीछे है अमित शाह, सब घोटालों मे शामील हूँ, चारो तरफ है मेरे चमचे, एमपी चुराना, बस यही मेरा कसूर; कुणाल कामराचा आणखी एक दोन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Video : झुठा हूँ मैं, पीछे है अमित शाह, सब घोटालों मे शामील हूँ, चारो तरफ है मेरे चमचे, एमपी चुराना, बस यही मेरा कसूर; कुणाल कामराचा आणखी एक दोन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Nashik Crime : गृहमंत्र्यांची पाठ फिरताच नाशिक हादरलं, जुन्या भांडणाची कुरापत काढत युवकावर सपासप वार
गृहमंत्र्यांची पाठ फिरताच नाशिक हादरलं, जुन्या भांडणाची कुरापत काढत युवकावर सपासप वार
Devendra Fadnavis on Kunal Kamra: एकनाथ शिंदेंकडे बाळासाहेबांचा वारसा, जनतेमध्ये त्यांना प्रचंड आदर; देवेंद्र फडणवीसांनी कुणाल कामराला फटकारलं, म्हणाले...
एकनाथ शिंदेंकडे बाळासाहेबांचा वारसा, जनतेमध्ये त्यांना प्रचंड आदर; देवेंद्र फडणवीसांनी कुणाल कामराला फटकारलं, म्हणाले...
Anjali Damania : याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, कामरावर सोडा आधी FIR हा शिंदे गटाच्या या सगळ्यांवर झाला पाहिजे; अंजली दमानियांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत हल्लाबोल
याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, कामरावर सोडा आधी FIR हा शिंदे गटाच्या या सगळ्यांवर झाला पाहिजे; अंजली दमानियांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत हल्लाबोल
Embed widget