एक्स्प्लोर

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ? तत्कालीन पोलिस अधीक्षकांना धमकावलं, CBI चा आरोप

Anil Deshmukh : गिरीश महाजन प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठी अनिल देशमुखांनी तीन वेळा फोन केल्याचा दावा जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी केला आहे.  

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील एक प्रकरण समोर आलं असून त्यामुळे देशमुखांसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना तत्कालीन एसपींना त्यांनी फोन करून धमकी दिली होती असा आरोप सीबीआयने मोक्का न्यायालयात केला आहे. एका छोट्या कामासाठी गृहमंत्र्यांनी किती वेळा फोन करायचे? असं म्हणत अनिल देशमुखांनी एसीपीला धमकावलं होतं असा आरोप सीबीआयनं केला आहे. 

अनिल देशमुखांनी जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांना धमकी दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला अशी माहिती सीबीआयची कोर्टामध्ये दिली.

भाजपचे नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर केला होता. त्या प्रकरणात सीबीआयने सविस्तर अहवाल न्यायालयात सादर केला असून त्यामध्ये अनिल देशमुखांनी एसपीला धमकी दिल्याचा दावा केला आहे. 

गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव

गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारदाराची तक्रार नोंदवून घ्या असे आदेश अनिल देशमुखांनी जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना दिले होते. पण हा गुन्हा जळगावच्या हद्दीत नाही, त्यामुळे पुण्यात हा गुन्हा नोंदवावा अशी भूमिका प्रवीण मुंडे यांनी घेतली. परंतु गृहमंत्री अनिल देशमुखांनी त्यांचं ऐकून घेतलं नाही, त्यांनी गुन्हा नोंदवून घ्यायला भाग पाडल्याचा आरोप आहे. प्रवीण मुंडे यांनी याबाबतची कबुली सीबीआयला दिली असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. 

जळगावमधील एका शिक्षण संस्थेमधील बोर्डवर गिरीश महाजन संचालक होते. त्या शिक्षण संस्थेचा ताबा कुणाकडे असावा यावरून वाद झाला. यामध्ये गिरीश महाजन यांनी इतर संचालकांवर दबाव आणल्याचा आरोप होता. या प्रकरणी गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुणे पोलिसांनी जळगावमध्ये जाऊन तपास केला होता. 

त्यावेळी तत्कालीन अनिल देशमुखांनी आपल्यावर दबाव आणल्याचा दावा जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांनी केल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. 

अनिल देशमुखांनी नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर लगेचच देशमुखांविरोधातील हे प्रकरण चर्चेत आलं आहे.         

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Embed widget