एक्स्प्लोर

परमबीर सिंह आणि सचिन वाझेंनी मनसुख हिरेनची हत्या घडवून आणली, अनिल देशमुखांचा आरोप, म्हणाले, फडणवीसांना याची कल्पना होती

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis), परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे तिघेही एकच आहेत. फडणवीसांच्या जवळचे असणारे परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना या हत्येसंदर्भात माहिती होती, असे अनिल देशमुख म्हणाले.

Anil Deshmukh on Devendra Fadnavis : मनसुख हिरेनची हत्या (Mansukh Hiren murder case) झाल्यावर त्याच्या कुटुंबातील लोकांना मृतदेहाची ओळख पटल्यावर शासनानं जाहीर केल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले. मृतदेहाची ओळख पटल्याशिवाय शासनाला त्या मृतदेहासंदर्भात माहिती देता येत नाही असेही देशमुख म्हणाले. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis), परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे तिघेही एकच आहेत. फडणवीसांच्या जवळचे असणारे परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना या हत्येसंदर्भात माहिती होती, त्यांनीच हत्या घडवून आणली असा आरोप देखील देशमुखांनी केला आहे. हे दोघे काय करतात ते फडणवीसांना माहित होतं असेही देशमुख म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी मनसुख हिरेनच्या हत्येसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर देशमुख बोलत होते. 

फडणवीसांचा गृहमंत्रीपदाचा किती अभ्यास हे दिसतंय 

देवेंद्र फडणवीस हे स्वत: गृहमंत्री आहेत. त्यांचा गृहमंत्रीपदाचा किती अभ्यास आहे हे दिसतयंत. मनसुख हिरेनची हत्या झाल्यावर त्याचा मृतदेह सकाळी सापडला. जोपर्यंत मृतदेहाची घरच्यांकडून ओळख पटत नाही तोपर्यंत, तोपर्यंत त्याबाबत माहिती देता येत नाही. फडणवीसांना एवढंही ज्ञान नाही याचं मला आश्चर्य वाटत असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. मनसुख हिरेनच्या घरच्यांना मृतदेहाची ओळख पटल्यावर आम्ही जाहीर केल्याचे देशमुख म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी  मनसुख हिरेनच्या हत्येसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. 

फडणवीसांचा अनिल देशमुखांना नेमका सवाल काय?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना माझा केवळ एकच प्रश्न आहेत. मला माहिती आहे की ते याचे उत्तर देणार नाहीत आणि तशी अपेक्षा देखील माझी नाही. मात्र त्यांना माझा केवळ एक सवाल आहे की, मनसुख हिरेनची हत्या (Mansukh Hiren Murder Case) होणार आहे, हे अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) माहिती होतं की नाही? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. असा थेट सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनिल देशमुख यांना आव्हान दिले आहे. मनसुख हिरेनच्या हत्येच्या प्रकरणाबाबत सदनामध्ये मी का शंका घेतली? त्यावेळी मनसुख हिरेन यांना गायब करण्यात आलं आणि त्यांची हत्या होऊ शकते, अशी भीती मी व्यक्त केली होती. त्यामुळे माझे स्पष्ट मत आहे की तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत उत्तर द्यावं, ते यावर भाष्य करणार नाहीत. मात्र यावरचे उत्तर नक्कीच कधी ना कधी बाहेर येईल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला.

 

महत्वाच्या बातम्या:

Devendra Fadnavis: मनसुख हिरेनची हत्या होईल हे अनिल देशमुखांना माहिती होतं की नव्हतं? देवेंद्र फडणवीस यांचा थेट सवाल

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget