Yavatmal News : पाठपुरवठा करूनही घरकुलाचा हप्ता मिळता मिळेना; संतप्त युवकाचा पंचायत समितीतच स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न
Yavatmal News : पाठपुरावा करूनही घरकुलचा हप्ता मिळत नसल्याने एका युवकाने टोकाचे पाऊल उचलेल आहे. यात या तरुणाने पंचायत समितीत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय.

Yavatmal News यवतमाळ : घरकुलचा हप्ता मिळत नसल्याने एका युवकाने टोकाचे पाऊल उचलेल आहे. यात या तरुणाने पंचायत समितीत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय. गेल्या अनेक दिवसापासून घरकुल करिता असलेला हप्ता मिळत नसल्याने या तरुणाने आज बुधवारच्या दुपारच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पंचायत समितीमध्ये स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गटविकास अधिकारी आर. आर. खरोडे यांनी वेळीच हस्तक्षेप करुन हा सर्व प्रकार रोखत या युवकाची समजूत काढली. अन्यथा पंचायत समितीत आज मोठी घटना घडली असती. संतोष उकंडराव बुटले असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे मात्र आर्णी पंचायत समितीमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
पंचायत समितीतच स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीच्या माळेगाव येथील रहिवाशी असलेले संतोष उकंडराव बुटले यांचे वडील उकंडराव बुटले यांना घरकुल योजनेतून घर मिळाले होते. त्यासाठी त्यांना पहिल्या हप्त्यात 15 हजार रूपये मिळाले. मात्र, दुसरा हप्ता देण्यास पंचायत समिती मधील अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप बुटलेंनी केलाय. अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचेही बुटले म्हणले.
वडिल वयोवृद्ध असल्याने त्यांना कायम ये-जा करणे शक्य होत नव्हते. दूसरा हप्ता मिळावा यासाठी संतोष बुटले याने वेळोवेळी पाठपुरवठा सुरु ठेवला. मात्र, आपल्या सर्व प्रयत्नांना अपयश आल्याच्या संतापातून अखेर आज संतोष यांनी टोकाचे पाऊल उचलत आर्णीच्या पंचायत समितीमध्येच स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखात ही घटना रोखून धरली आणि मोठा अनर्थ टळला.
वीज उपकेंद्रात ग्रामस्थांकडून तोडफोड
वादळवाऱ्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या असंतोषातून यवतमाळच्या बाभुळगाव उपविभागातील घारफळ उपकेंद्रात ग्रामस्थांनी प्रचंड तोडफोड करत गोंधळ घातला. तसेच येथील ऑपरेटरला देखील मारहाण करून त्याला बांधून ठेवले. यामुळे आज बाभुळगाव उपविभाग केंद्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी 5 ते 6 तास फीडर देखील बंद करून ठेवले. या घटनेमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
बराचवेळ वीज पुरवठा होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी हा हल्ला चढविला. यात उपकेंद्राचे दरवाजे तोडून ग्रामस्थ आत शिरले. यावेळी दगडफेक करून खिडक्यांच्या काचा देखील फोडण्यात आल्या. तसेच या ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी पुढे आलेल्या कर्मचार्यांना देखील मारहाण करण्यात आलीय. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून वीज अभियंता आणि कर्मचार्यांवरील हल्यांमुळे आता महावितरण कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याची माहितीही पुढे आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
