ST Strike : 'नवरा मेला तरी चालेल,विलनीकरणाशिवाय संप मागे घेणार नाही', एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीचा टाहो!
ST Strike : मागील बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर उपाय म्हणून त्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मुंबई : मागील काही काळापासून संपूर्ण राज्य एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने हादरुन गेलं आहे. दरम्यान हा संप मिटावा यासाठी राज्य सरकारने आज महत्वपूर्ण घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण कर्मचाऱ्यांची मूळ मागणी म्हणजे एसटीचं शासनात विलिनीकरण यावर काहीही तोडगा न निघाल्याने कर्मचारी अद्यापही नाराज आहेत. दरम्यान एका कर्मचाऱ्याच्या भावुक पत्नीने 'या संपात नवरा मेला तरी चालेल, पण विलनीकरणाशिवाय संप मागे घेणार नाही' अशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
विलनीकरणाबाबत बोलताना शासनाकडून सध्या हा मुद्दा हायकोर्टाच्या समितीसमोर आहे. सरकारने या समितीसमोर काय भूमिका मांडावी याबाबतही चर्चा झाली. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, त्याबाबतचा अहवाल येणार आहे, तो अहवाल आम्ही स्वीकारु असं अनिल परब यांनी सांगितलं.
एसटी कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन कसं असेल? जाणून घ्या
1. नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी 5000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनामध्ये 7,200 रुपये वाढ होतील.
2. दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 4000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनात 5,760 रुपये वाढ होतील.
4. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 30 वर्षे किंवा त्याहून जास्त झाली आहे त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 2,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना इतर भत्त्यासह 3,600 रुपयांची वाढ मिळणार आहे.
हे ही वाचा
- ST Workers New Salary : 3 ते 5 हजार रुपये वाढीसह अन्य भत्ते, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ?
- ST Strike : एसटी संप मिटणार? कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय, अनिल परबांची घोषणा
- ST Strike : एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा प्रस्ताव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
