एक्स्प्लोर
नवनीत कौर राणा यांच्या खासदारकीला आव्हान, उच्च न्यायालयात याचिका दाखल
नवनीत कौर यांनी असे करुन मागासवर्गींचा संवैधानिक अधिकार हिरावून घेतला असल्याचा आरोप याचिकांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे नवनीत कौर राणा यांची निवड रद्द ठरवावी अशी मागणी माजी खासदार यांनी याचिकांद्वारे केली आहे.

अमरावती : नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा यांच्या खासदारकीलाच आव्हान देण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नवनीत राणा यांच्या विरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणी सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररित्या दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. मात्र नवनीत कौर यांनी लुभाणा समुदायाच्या आरक्षणातून निवडणुकीसाठी अर्ज भरला होता आणि त्या विजयी झाल्या असं याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. Navneet Kaur Rana | खासदार नवनीत कौर राणा जेव्हा बांधावर जाऊन पेरणी करतात! | अमरावती | ABP Majha नवनीत कौर यांनी असे करुन मागासवर्गींचा संवैधानिक अधिकार हिरावून घेतला असल्याचा आरोप याचिकांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे नवनीत कौर राणा यांची निवड रद्द ठरवावी अशी मागणी माजी खासदार यांनी याचिकांद्वारे केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत कौर राणा विजयी झाल्या होत्या. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव त्यांनी केला होता. Navneet Kaur Rana | खासदार नवनीत कौर राणांकडून जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती | अमरावती | ABP Majha
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र























