एक्स्प्लोर

Amravati Violence : अमरावती शहर वगळता जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी संचारबंदी; दुपारनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होण्याची शक्यता

Amravati Violence : अमरावती शहर वगळता जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी संचारबंदी. दुपारनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होण्याची शक्यता असून अटकेतील भाजप नेत्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Amravati Violence : त्रिपुरातील कथित घटनेनंतर झालेल्या हिंसाचारामुळे अमरावती शहर वगळता जिल्ह्यातील संचारबंदी सलग चौथ्या दिवशी कायम आहे. तीन दिवसांसाठी बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा आणखी 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आज दुपारनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. पण उद्यापासून इंटरनेट सेवा सुरु होते की, बंदच राहते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर तिकडे अमरावतीतील दंगल भडकवल्याप्रकरणी अटक केलेले भाजप नेते अनिल बोंडेंसह (Anil Bonde Arrest) सर्व भाजप नेत्यांना जामीन मंजूर झाला आहे. काल सकाळी अमरावती पोलिसांनी बोंडेंसह भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, गटनेते तुषार भारतीय, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्यासह 12 जणांना अटक केली होती. 

Amravati Violence : अमरावती शहर वगळता जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी संचारबंदी; दुपारनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होण्याची शक्यता

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) उद्या (बुधवारी) अमरावती दौऱ्यावर जाणार होते. परंतु, त्यांच्या अमरावती दौऱ्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वतः किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलंय की, "आता ठाकरे सरकारने माझ्या उद्याच्या अमरावती दौऱ्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे." तसेच, ट्वीट करताना किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्तांनी पाठवलेल्या पत्राची प्रत जोडली आहे. 

अमरावती हिंसाचाराप्रकरणी अनिल बोंडेंना जामीन

माजी मंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंना (Anil Bonde Arrest) जामीन मिळाला आहे. अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. अनिल बोंडेंवर ही कारवाई केली होती. दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे अशा कलमांतर्गत डॉ. अनिल बोंडेंवर गुन्हे नोंद  करण्यात आले आहेत. भाजपकडून पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती. डॉ. अनिल बोंडेंच्या नेतृत्वात शनिवारी भाजपनं अमरावतीत आंदोलन केलं होतं. त्यात झालेल्या हिंसेला बोंडे  जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी अनिल बोंडेंना अटक केली होती. 

पाहा व्हिडीओ : अमरावतीतील इंटरनेट सेवा दुपारनंतर पूर्ववत होण्याची शक्यता

अमरावतीमध्ये मागील तीन दिवस झालेल्या हिंसाचारानंतर आज संचारबंदी (Amravati Curfew) लागू करण्यात आली आहे. त्रिपुरातील घटनेनंतर शुक्रवारी काही संघटनांनी काढलेल्या मोर्चात तोडफोड करण्यात आली.  आता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपनं काल (14 नोव्हेंबर) अमरावती जिल्हा बंदची हाक दिली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, हिंसाचाराबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत असल्यानं जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही तीन दिवस बंद ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, अमरावती, नांदेड आणि मालेगावात घडलेल्या हिंसाचारावरुन राष्ट्रवादीनं भाजपवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी तीन शहरात दंगली घडवण्याचं षडयंत्र भाजपनं रचलं, असा दावा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी केला आहे. यामागे भाजप नेते अनिल बोडेंसह अनेक नेत्यांचा हात आहे, असा आरोपही मलिकांनी केला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget