Amravati News: शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरात भरता येणार पिक कर्ज; अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक निर्णय
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ऐतिहासिक निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना आता शून्य टक्के व्याजदरात पिक कर्ज भरता येणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील 50 हजार शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
Amravati News अमरावती: अमरावती (Amravati News) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ऐतिहासिक निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना आता शून्य टक्के व्याजदरात पिक कर्ज भरता येणार आहे. दरवर्षी राज्य सरकार पीक कर्जावरील व्याजाची 6 टक्के रक्कम बँकेत जमा करत होती. मात्र, आता अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे 31 मार्च पर्यंत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दाराने पीक कर्ज परत करता येणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकाकडून सहा टक्के व्याजमाफी न देता पूर्ण सहा टक्के धरून कर्ज वसूल करण्यात येत होते. परंतु आता या निर्णयामुळे 6% जे केंद्र आणि राज्य सरकार माफ करते होते ते व्याज वसूल न करता मार्च महिन्यापर्यंत जे कर्ज पूर्ण भरतील त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर रक्कम जमा करावी, या अटीशर्तीवर शून्य दरात सध्या कर्ज वसुली करण्यात येत असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. या पद्धतीची ही महाराष्ट्रातील पहिली बँक असल्याने या निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील 50 हजार शेतकऱ्यांना होणार असल्याचे देखील बच्चू कडू म्हणाले.
जिल्ह्यातील 50 हजार शेतकऱ्यांना होणार फायदा
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकने अतिशय क्रांतिकार आणि शेतकऱ्यांच्या हिताचा धाडसी निर्णय घेतला आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक सहा टक्के व्याजमाफी न देता पूर्ण सहा टक्के धरून कर्ज वसूल करत आहे. परंतु आम्ही शेतकऱ्याचा हिताचा निर्णय म्हणून 6% जे केंद्र आणि राज्य सरकार माफ करते ते व्याज वसूल न करता मार्च महिन्यापर्यंत जे कर्ज पूर्ण भरतील त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आमच्या खात्यावर जमा करावे, या अटी शर्तीवर शून्य दरात सध्या कर्ज वसुली करण्यात येत असल्याची माहिती अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरात भरता येणार पिक कर्ज
सरकार हे शासन नियमानुसार बँकेत रक्कम जमा करेल तेव्हा करेल, मात्र आम्ही त्यापूर्वी हा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलास दिला आहे. हल्ली या प्रक्रियेनुसार चार ते पाच महिन्यात ती रक्कम जमा होते. आम्ही त्याचा विचार न करता शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेत हे सहा टक्के शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. पूर्वी ज्या पद्धतीने कार्यपद्धती चालत होती त्याच पद्धतीने चालावी, अशी आमची आग्रही मागणी होती.
उद्या चालून सरकारने काहीही निर्णय घेतला तरी शेतकऱ्यांना कर्ज भरणे हे अधिक सुलभ व्हावं यासाठी आम्ही हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले. या निर्णयामुळे 50 ते 55 हजार लोकांना याचा फायदा होणार आहे आणि उर्वरित 22 ते 23 कोटी रुपये जे 6% कर्ज वसुली आहे ते आम्ही नंतर शेतकाऱ्यांकडून वसुल करता येणार आहे. राज्यात इतर सहकारी बँकेने देखील असा निर्णय घ्यावा आणि हा निर्णय घ्यायला सरकारला बाध्य करावं. अशी मागणी देखील बच्चू कडू यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या