एक्स्प्लोर

मोठी बातमी : बच्चू कडूंना ठाकरेंनी पैसा पुरवला, रवी राणांचा सर्वात मोठा आरोप, संपत्ती जाहीर करण्याचं आव्हान!

Ravi Rana On Bacchu Kadu: नवनीत राणा यांना पाडण्यासाठी बच्चू कडूंना शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी पैसे पुरवल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू आणि उद्धव ठाकरेंवर केलाय.

Ravi Rana On Bacchu Kadu अमरावतीअमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Lok Sabha Constituency) महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) आणि प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वादाला आता आणखी धार चढताना दिसत आहे. अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानावरून दोन्ही गाटात उफाळून आलेल्या वाद आणि त्यानंतर झालेल्या हाई वोल्टेज ड्रामानंतर आता दोघांमध्ये शाब्दिक चकमक रंगताना दिसत आहे. अशातच आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडूंवर खळबळजनक आरोप करत थेट खुले आव्हान दिले आहे.

नवनीत राणा यांना पाडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पैसे पुरवल्याचा आरोप रवी राणांनी केलाय. बच्चू कडू आणि माझी संपत्ती आज लक्षात घेतली तर त्यात मोठी तफावत आढळून येईल. खऱ्या अर्थानं बच्चू कडू यांनी आपली संपत्ती जाहीर करावी, जर माझी संपत्ती जास्त असेल तर मी त्यांना देईल आणि बच्चू कडू यांची जास्त असली तर त्यांनी ती जनतेत वाटावी, असं मी त्यांना आवाहन देत असल्याचे सांगत बच्चू कडू यांना रवी राणांनी खुले आव्हानच दिले आहे. 

दंगलीवेळी एकाही हिंदूंच्या घरी भेट दिली नाही- रवी राणा

आमदार रवी राणा म्हणाले की,  'बच्चू कडू हे मंत्री असताना अमरावतीत मोठी हिंसक दंगल झाली तेव्हा त्यांनी एकाही हिंदूंच्या घरी भेट दिली नाही. उमेश कोल्हे हत्याकांड झालं तेव्हा देखील त्यांनी भेट दिली नाही. उलट उमेश कोल्हे हत्याकांड हे रॉबरी मध्ये कन्व्हर्ट केल्या गेलं होतं. मात्र, आम्ही त्यात हस्तक्षेप करत त्या प्रकरणी अमित शाह यांना भेटून एनआयए (NIA) चौकशी लावून या प्रकरणातील आरोपींना अटक केली.' 

बच्चू कडूंना मातोश्रीवरुन सुपारी - आमदार रवी राणा

अमरावती लोकसभा मतदारसंघातील कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामध्ये आता अधिक भर पडली असून बच्चू कडूंना उद्धव ठाकरेंचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोपही आमदार रवी राणा यांनी केला आहे. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन पैसे पूरवत सुपारी घेतल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. परिणामी, आज माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही मात्र, बच्चू कडूंवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहे. आज बच्चू कडू यांची संपत्ती माझ्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. जर ही संपत्ती माझ्या संपत्तीपेक्षा कमी निघाली तर मी राजकारण सोडेल, असे खुले आव्हान देखील रावी राणा यांनी दिले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतराAnandache Paan: 'गोष्ट पैशापाण्याची' नंतर Prafull Wankhede यांचं 'ओके सॉरी थँक्यू' नावाचं नवं पुस्तकNitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Embed widget