Ajay Baraskar : मनोज जरांगेंसोबत कोअर कमिटीमध्ये होता, तर देहूहुन तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन आलो का म्हणता? अजय बारसकरांनी थेट उत्तर टाळले!
Ajay Baraskar : पहिल्यांदा बारसकर जरांगे पाटील यांच्या विरोधात सामोरे आल्यानंतर त्यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केलाचा आरोप केला होता.

मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधूनच मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर 54 लाख कुणबी सापडल्या होत्या, त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि सगसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी केली होती. मात्र, या सर्व मागण्या राज्य सरकारकडून बाजूला ठेवण्यात आल्या आणि स्वतंत्र 10 टक्के आरक्षणाची घोषणा एकदिवसीय विशेष अधिवेशनातून करण्यात आली.
यानंतर जरांगे पाटील पुन्हा आपल्या मुळ मागण्यांवर कायम असून त्यांनी उपोषण सुरु केलं आहे. त्याचबरोबर राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. आता दुसरीकडे, त्यांच्यासोबत काम केलेल्या माजी सहकाऱ्यांकडून आरोपांवर आरोप केले जात आहेत. यामध्ये अजय बारसकर सुद्धा आघाडीवर आहेत. बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करत आरोपांच्या पिंजरात उभा केलं आहे.
जरांगे यांनी भूमिका कशा पद्धतीने बदलली तसेच ते 2017 मध्ये स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही होते. आता त्यांनी भूमिका बदलून कुणबी प्रमाणपत्रासाठी आग्रह केला असे आरोप आज (24 फेब्रुवारी) पुन्हा बारसकर यांनी केला. जरांगे पाटील यांच्या विरोधात उद्या (25 फेब्रुवारी) बॉम्ब टाकणार असल्याचेही ते म्हणाले. नार्को टेस्टची मागणी करत त्यांच्या नातेवाईकांकडे 45 डंपर कसे आले? याची चौकशी करण्यासाठी ईडीकडे जाणार असल्याचे सांगितले. अजय बारसकर यांनी पत्रकार परिषदेतील सर्वच प्रश्नांना आक्रमकपणे उत्तर दिली. मात्र, एका प्रश्नावर मात्र त्यांची अडचण झाल्याची दिसून आले.
तर तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन आलो का म्हणता?
पत्रकार परिषदेमध्ये अजय बारसकर यांना तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीमध्ये सहा महिन्यांपासून कार्यरत होता, तर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये तुम्ही देहूवरून तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन आलो आहोत, अशी स्वतंत्र ओळख का करून देता? अशी विचारणा त्यांना करण्यात आली. मात्र, या प्रश्नावर त्यांना थेट उत्तर देता आलं नाही. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला तुम्ही पत्रकार परिषदेला उशिरा आले का? असा प्रतिप्रश्न केला. मात्र थेट उत्तर देणे टाळलं. पहिल्यांदा बारसकर जरांगे पाटील यांच्या विरोधात सामोरे आल्यानंतर त्यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केलाचा आरोप केला होता. त्यानंतर जरांगे पाटील माझ्याकडून तुकाराम महाराज यांचा अपमान झाला असल्यास बिनशर्त माफी मागतो, असे म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
