एक्स्प्लोर

Sushma Andhare : भाजपनेच किरीट सोमय्यांचा व्हिडीओ बाहेर काढला; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

Maharashtra Politics News : अधिवेशनाच्या काळात किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर काढणं, यात भाजपचाच हात आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Sushma Andhare on Kirit Somaiya : अधिवेशनाच्या काळात भाजप नेते किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) व्हिडीओ बाहेर काढण्यात भाजपचाच हात आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलं आहे. किरीट सोमय्यांनी आतापर्यंत ज्यांच्यावर आरोप केले. त्यांचे घोटाळे बाहेर काढले, ते सगळे नेते आता भाजपसोबत आहेत. त्यामुळे सगळ्यांना चांगलं ठरवण्यासाठी भाजपने किरीट सोमय्यांचा व्हिडीओ बाहेर काढून तो व्हायरल केला असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. त्यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

'विविध कारणांमुळे 40 महिलांची फसवणूक केली'

किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओसंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, ''चर्चा करावी असा हा व्हिडीओ नाही. प्रत्येक व्यक्तीबद्दल ते काय बोललं? त्यांनी का केलं याचा परिणाम होत असतो. आता अनेकांचे वस्त्रहरण करणाऱ्याचं वस्त्रहरण केलं आहे. किरीट सोमय्यांकडून 40 महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. ईडी, सीबीआय चौकशी लावण्याच्या धमकी देत अधिकाऱ्यांच्या घरातील महिलांचं शोषण करण्यात आलं आहे. 30-35 व्हिडीओ आहेत. किमान तीन साडे तीन तासाचा व्हिडीओ आहे. भाजप पद देतो, घटस्फोट करून देतो, अस सांगून फसवणूक केली आहे. त्यामुळे हे योग्य नाही. भाजपचे लोक काहीही करताना दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.''

'भाजप बाकी नेत्यांना चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतंय'

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, ''यासंपूर्ण प्रकरणात महिलांची गोपनीयता जपली पाहिजे. किरीट सोमय्यांनी जे काही केलं ते वाईटच आहेत. मात्र भाजपने यापूर्वी अनेक गोष्टी लपवल्या आणि जिरवल्या आहेत. किरीट सोमय्यांची भाजपसाठीची उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे त्यांचा व्हिडीओ आता अधिवेशनाच्या काळात बाहेर काढला आहे. गृहमंत्री त्यांच्यावर कारवाई करतील का असा प्रश्न आहे?'' दरम्यान, या अगोदर त्यांच्याकडे अनेक जणांनी कारवाई करण्याची मागणी केली. पण, त्यांनी केली नाही मग आताच हा व्हिडीओ बाहेर काढून भाजप बाकी नेत्यांना चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं अंधारे म्हणाल्या. 

'बोले तैसे न चाले त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस'

प्रदीप कुरुलकरांच्या प्रकरणातील व्हिडीओदेखील बाहेर आले नाहीत, पण भाजपच्या परवानगीशिवाय किरीट सोमय्यांचे व्हिडीओ बाहेर काढले आहेत, असंही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीसोबत कधीच जाणार नाही म्हणणारे, देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली. बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले, पण बोले तैसे न चाले त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस आहे, असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला आहे. 

हेही वाचा :

Kirit Somaiya Video : किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी होणार : देवेंद्र फडणवीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navratri 2024: अदानी एनर्जीचा मोठा निर्णय; मुंबईतील नवरात्रौत्सव मंडळांना स्वस्त दरात वीज, जाणून घ्या अर्ज करण्याची  A टू Z प्रक्रिया
नवरात्रीत अदाणीतर्फे सवलतीच्या दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
राज्यात शिक्षक पदांची निर्मित्ती, कोलवालांचं मानधन वाढवलं; मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय
राज्यात शिक्षक पदांची निर्मित्ती, कोलवालांचं मानधन वाढवलं; मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय
Uddhav Thackeray : रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
Baramati Student Murder : बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 30 सप्टेंबर 2024: ABP MajhaLadki Bahin Yojana Scam : नाव बहिणीचं; लाभार्थी पुरूष; नांदेड जिल्ह्यात मोठा घोटाळाDilip Walse Patil :  शरद पवारांना भेटणार असल्याच्या बातम्या निराधार आणि खोडसाळAashish Hemrajani : Book My Showचे सीईओ आशिष हेमराजानी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navratri 2024: अदानी एनर्जीचा मोठा निर्णय; मुंबईतील नवरात्रौत्सव मंडळांना स्वस्त दरात वीज, जाणून घ्या अर्ज करण्याची  A टू Z प्रक्रिया
नवरात्रीत अदाणीतर्फे सवलतीच्या दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
राज्यात शिक्षक पदांची निर्मित्ती, कोलवालांचं मानधन वाढवलं; मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय
राज्यात शिक्षक पदांची निर्मित्ती, कोलवालांचं मानधन वाढवलं; मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय
Uddhav Thackeray : रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
Baramati Student Murder : बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Vipul Kadam: श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले
बातमी फुटताच श्रीकांत शिंदेंचा मेहुणा कामाला लागला, गुहागर विधानसभेची उमेदवारी पक्की?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
One Nation One Election : केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
Embed widget