(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut: "ते पुन्हा येणार असतील तर स्वागत", संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
Sanjay Raut: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन जावंच लागेल, असे संजय राऊत म्हणाले
मुंबई : महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल, अशा आशयाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) व्हिडीओ भाजपकडून शेअर करण्यात आला, आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली. त्यामुळे सध्या उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार का या चर्चांना उधाण आलं. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मात्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांचे स्वागत करतो, असा टोला संजय राऊतांनी फडणवीसांना लगवला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमुळे (Ajit Pawar) भाजपची प्रतिमा मलीन झाल्याचे राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, ते पुन्हा येणार असतील तर त्यांचं स्वागत करतो. कारण ते किमान कायदेशीर मुख्यमंत्री असतील. जर महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भाजपची प्रतिमा मलीन झाली आहे. एकनाथ शिंदे यांना लवकरच मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल
संजय राऊतांनी मोदींवर देखील पक्ष फोडीच्या राजकारणावरून हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले, मोदींनी एक संस्था सुरु करुन चालवून दाखवावी. पक्ष फोडल्यानंतर मोदींकडून नेत्यांना बदनामी करण्यास सुरुवात केली आहे. आज शरद पवारांनार टीका केली उद्या बाळासाहेबांवर टीका करतील. एकनाथ शिंदेंसारखे मुंड्या हलवत बसतील.
शरद पवारांवरील टीका ही विकृती
शरद पवारांच्या टीकेवरून बोलताना संजय राऊत म्हणाले, शरद पवारांवरील टीका ही विकृती आहे 2024 ला या विकृतीचा अंत होईल. पवार कृषीमंत्री नव्हते तेव्हापासून पवारांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं. पवारांना शेतीच्या कार्यासाठी पद्मविभूषण या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आली आहे. पवारांनी नेहमी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला आहे. शिंदे, अजित पवारांपेक्षा गुलाम बरे अशी स्थिती करून ठेवली आहे . शरद पवारांवर टीका होत असताना अजित पवारांनी निघून जायला हवं होतं.
शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची राज्यात प्रतिमा मलीन
शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची राज्यात प्रतिमा मलीन झाली याची सर्व माहिती केंद्राला मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल राजीनामा द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने त्या पद्धतीने निर्णय दिला आहे तो मान्य करावा लागेल. अशा प्रकारचा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतो, असेही राऊत म्हणाले.
हे ही वाचा :