Praveen Pardeshi : देवेंद्र फडणवीसांचा खास मोहरा मुख्यमंत्री कार्यालयात, प्रवीण परदेशींची मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती
Praveen Pardeshi : निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Praveen Pardeshi : निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) हे मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयात दाखल होणार आहेत. मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Financial Advisor) म्हणून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्रवीण परदेशी हे सध्या 'मित्रा' या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष आहेत. परदेशी हे काही काळ राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सुद्धा कार्यरत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे ते मर्जीतील अधिकारी मानले जातात.
प्रवीण परदेशी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केले आहे. त्यांच्या कामाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेहमीच समाधान राहिलेले आहे. कोरोना काळाच्या आधी त्यांनी महापालिका आयुक्त म्हणून देखील काम केले आहे. आता निवृत्तीनंतर प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती होणार आहे.
प्रवीण परदेशी यांच्यावर मोठी जबाबदारी
महाराष्ट्राला लवकरच एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले आहे. त्या अनुषंगाने ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्रवीण परदेशी यांच्यावर राज्याच्या आर्थिक व्यवस्थेला चालना कशी द्यायची? तिजोरीवर वेगवेगळ्या योजनांचा जो भर पडला आहे, त्याला कसे कमी करायचे? जनतेला दिलासा कसा द्यायचा? या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे.
प्रवीण परदेशी यांनी भूषवलेली पदे
1985 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी प्रवीण परदेशी हे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून मुख्यमंत्री सचिवालयात रुजू होत आहेत. ते मित्रा या राज्य नियोजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष देखील आहेत. परदेशी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























