एक्स्प्लोर

परभणी जिल्हा परिषदेने केला रिलायन्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव  

परभणीत (Parbhani) यंदा अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र पंचनामे करतांना (Reliance crop insurance) कडून नुकसानग्रस्त क्षेत्र व टक्केवारी कमी टाकलं आहे.

परभणी : परभणी जिल्ह्यात (Parbhani) यंदा अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र पंचनामे करतांना  रिलायन्स क्रॉप इन्शोरंसकडून (Reliance crop insurance) नुकसानग्रस्त क्षेत्र व टक्केवारी कमी टाकल्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसान भरपाई मिळणार आहे. रिलायन्स कंपनी पावलोपावली करार भंग करत असल्यामुळे कंपनीवर करार भंग केल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात यावा असा ठराव परभणी जिल्हा परिषदेने घेतला आहे.

परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासन व रिलायन्स विमा कंपनीचे अधिकारी तसेच कृषि विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पीक विम्याच्या नुकसानीसह पंचनाम्याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. विशेषतः जिल्ह्यात  7 व 8 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्याप्रमाणेच जिल्ह्यात सरासरी 247 मि.मी. पाऊस झाला.सप्टेंबर महिन्यातील जिल्ह्यातील पावसाची सरासरी 167 मि.मी. एवढीच आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा परिस्थितीत पिक विमा नुकसान व पंचनामे या विषयाने या बैठकीत व्यापक चर्चा अपेक्षित होती. परंतु, रिलायन्स कंपनीचे अधिकारी बैठकीकडेच फिरकले नाहीत.

शिवाय पिक नुकसान तक्रारीची संपूर्ण माहिती NCIP (National Crop Insurance Portal) वर कंपनीने अपलोड करुन सर्वेक्षण हे तक्रारीच्या क्षेत्रानुसार ठरवणे आवश्यक असताना कंपनी असे करतांना दिसुन येत नाही. तक्रारीनुसार नुकसानग्रस्त क्षेत्र 25 % पेक्षा अधिक असतांना कंपनी प्रक्षेत्रावर वैयक्तीक सर्वे करत आहेत. यामुळे रिलायन्स कंपनी कडुन वारंवार कराराचा भंग केला जात असल्याने या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा असा ठराव जिल्हा परिषद परभणीने घेतला आहे.
      
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर,उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्यासह कृषी व पशुसंवर्धन सभापती मिराताई टेंगसे, समाजकल्याण सभापती रामराव उबाळे, श्रीनिवास जोगदंड, श्रीनिवास मुंढे, सुभाष कदम,मीनाताई राऊत, शालीनीताई राऊत, इंदूमतीबाई घुगे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी गोविंद लांडगे, हेमचंद्र शिंदे यांची उपस्थिती होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athwale On Chandrakant Patil | निमंत्रण स्वीकारूनही गैरहजेरी! चंद्रकांत पाटलांवर आठवले नाराजPune Hit And Run Case | खडकी हिट अँण्ड रनमधील आरोपीला पुणे पोलिसांनी केली अटकAndheri Subway Water Logging : अंधेरी सबवे पुन्हा तुंबला! पाच फूट पाणी भरल्यानं सबवे बंदCity 60 | सिटी सिक्स्टी मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Embed widget