Maharashtra Corona : पोलिसांनाही आता 'वर्क फ्रॉम होम', पोलिसांसाठी गृह विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे गृह विभागाने पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिसांनाही आता वर्क फ्रॉम होम लागू होणार आहे.
Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे धोका पत्करून पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे आता गृह विभागाने पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिसांनाही आता वर्क फ्रॉम होम लागू होणार आहे. पोलीस दलातील 55 वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
कोरोनाच्या वाढता धोक्यामुळे पोलिसांनाही संकटाचा सामना करावा लागतोय. जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र पोलिसांना 24 तास रात्रंदिवस कामावर रुजू व्हावे लागत आहे. आतापर्यंत अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मुंबईतही गेल्या 24 तासांमध्ये 71 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने 55 वर्षांवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याचा आदेश दिला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.
COVID19 | Maharashtra reports 26,538 new cases, 8 deaths and 5,331 discharges today; Active cases rise to 87,505. State's Omicron case tally at 797 including 330 recoveries pic.twitter.com/0C7zQc1xIS
— ANI (@ANI) January 5, 2022">
पाहा व्हिडीओ : 55 वर्षावरील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम : दिलीप वळसे पाटील
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ''कोरोनाचा वाढता धोका पाहता पोलिसांच्या संरक्षणासाठी 55 वर्षांवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्यता आला आहे. त्यांनी कामावर न येता घरुनच काम करायचे आहे.''
महत्त्वाच्या बातम्या :
- Bulli Bai App Case : बुली बाई अॅप बनवणाऱ्या मुख्य आरोपी अटक, दिल्ली पोलिसांकडून आसाममध्ये कारवाई
- Lockdown : भारतात तिसऱ्या लाटेचं तांडव? जानेवारी महिन्यात पीक पॉईंट : शास्त्रज्ञांचा अंदाज
- Google CFO Salary : गुगलच्या उच्च अधिकाऱ्यांचा पगार माहित आहे का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha