MPSC : एमपीएससीच्या गट क वर्गातील पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी, 3 एप्रिलला होणार परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) गट क वर्गातील पदांसाठी घेण्यात येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र (Admit Card) जारी करण्यात आले आहे.
मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) गट क वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र आज जारी करण्यात आलं आहे. आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. पात्र उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in वर जाऊन हे प्रवेशपत्र डाऊनलोड करावं असंही आवाहन करण्यात आलं आहे. ही परीक्षा 3 एप्रिलला घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेली ही परीक्षा 900 जागांसाठी होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत ही 22 डिसेंबरपर्यंत होती. आता ही परीक्षा 3 एप्रिलला होणार असून त्यासंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे हेही आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर स्पष्ट केलं आहे.
आयोगामार्फत दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. pic.twitter.com/uYqDezdtPW
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) March 25, 2022
परीक्षा कक्षात प्रवेश करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. तसेच परीक्षा केंद्रावरती परीक्षेच्या वेळेपूर्वी दीड तास हजर रहावं असंही आवाहन करण्यात आलं आहे.
परीक्षा केंद्रावर कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या निवेदनात सांगितलं आहे. तसेच परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यामध्ये काही अडचणी आल्यास त्यासंबंधी आयोगाने हेल्पलाईन क्रमांक आणि वेबसाईटची माहिती शेअर केली असून त्यावर उमेदवारांनी संपर्क करावा असं आवाहन केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आता दिव्यांग नागरिकही IPS सह इतर नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात! जाणून घ्या सविस्तर
- PSI Result : नोकरी सोडली आणि धाडस केलं, अखेर बिकट परिस्थितीवर मात करत फौजदार झाला.., औरंगाबादच्या योगेश नाल्टेची कहाणी
- MPSC Result : बारामतीच्या शुभम शिंदेची कमाल; मोलमजुरी करणाऱ्याच्या मुलाने घातली PSI पदाला गवसणी