![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Raj Thackeray : राज ठाकरेंनी थेट सीएम एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले, घेतला तगडा निर्णय!
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही दंड थोपटताना उमेदवार देण्याची घोषणा केली आहे.
![Raj Thackeray : राज ठाकरेंनी थेट सीएम एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले, घेतला तगडा निर्णय! MNS president Raj Thackeray has announced to field a candidate while also against Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis Raj Thackeray : राज ठाकरेंनी थेट सीएम एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले, घेतला तगडा निर्णय!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/25/61b21ef75bf62b3e2e726f764de2840c1724562638093736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election 2024) महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मात्र एकला चलो रे भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणुकीला आतापर्यंत सात उमेदवार जाहीर करत त्यांनी घौडदोड कायम ठेवली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही दंड थोपटताना उमेदवार देण्याची घोषणा केली आहे.
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचे राजकारण सर्वांनीच पाहिलं असून ही परिस्थिती मनसेसाठी पोषक आहे. आम्ही सुमारे सव्वा दोनशे जागांवर निवडणूक लढवणार आहोत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केली. मनसे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेचा सरकारला फायदा होईल असं वाटत नाही
राज ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सरकारला फायदा होईल असं वाटत नाही. लोकांना काम हवं आहे, त्यांना काम द्या. ते फुकट पैसे मागत नाहीत. शेतकरी फुकट वीज मागत नाहीत. मत पाहिजे म्हणून ते मोफत देतात. लोकांनी दिलेल्या कराचे पैसे वाटप करीत असल्याची टीका सुद्धा राज ठाकरे यांनी केली. असे करून कसे चालणार? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य करण्यास मात्र राज ठाकरे यांनी नकार दिला. आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट असून मी यापूर्वी सुद्धा जाहीर केली असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर तोफ टाकली. ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच राज्यामध्ये फोडाफोडीच्या आणि जातीपतीच्या राजकारणाला सुरुवात झाली. आज जो काही राज्यात राजकीय चिखल झाला आहे त्याला शरद पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. पुलोद सरकार स्थाना झाल्यापासून राज्यात फोडाफोडीच्या राजकारणात सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म सुद्धा फोडाफोडीतूनच झाला. जातीपातीचे विषय त्यांनीच कालवल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. आता हाच कित्ता सर्वच राजकीय पक्ष गिरवत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)