(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray Movie : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेसाठी 'यक नंबर' जनमत बदलणार? चित्रपटांचा राजकीय प्रभाव
Raj Thackeray Movie : राज ठाकरे यांच्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Raj Thackeray Movie : भारतीयांच्या आयुष्यात सिनेमा हा अत्यंत प्रभावशाली माध्यम ठरतं. वेगवेगळ्या विषयांवर आधारित सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्याचा अनेकदृष्ट्या परिणाम हा जनमानसावर होत असतो. काही राजकीय चित्रपटांतील विषयांचा परिणाम समाजमनावर होताना दिसतो. मागील काही वर्षांत असे अनेक चित्रपट आले आणि लोकांची मतं देखील निर्माण केलीत. त्यातच आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पक्षाशी संबंधित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मागील काही काळात अनेक राजकीय नेत्यावर पक्षांच्या विषयांवर आधारित चित्रपट, वेब सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. ज्यामुळे लोकांना या चित्रपटातून नवीन नवीन गोष्टी कळल्या आणि संबंधित पक्षांना जे लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं ते त्या माध्यमातून पोहोचवलं गेलं.यामुळे लोकांचा संबंधित विषयाला पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोनही बदलला. पण राजकीय पक्ष आणि नेते यांच्याशी संबंधित सिनेमे बनवणं खूप आव्हानात्मक असतं.
आतापर्यंत आलेले राजकीय चित्रपट?
बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमा
शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यावर आधारित 'धर्मवीर'भाग एक आणि दोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित पीएम नरेंद्र मोदी
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आधारित 'अटल बिहारी वाजपेयी'
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित 'इमर्जन्सी'
राज ठाकरे यांच्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार
राज्यात नेहमीच चर्चेत असणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संबंधित चित्रपट लवकरच लोकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती तेजस्विनी पंडित आणि राजेश मापुस्कर करत आहेत. नुकतच या चित्रपटाचे एक पोस्टर लॉन्च करण्यात आले, त्यामुळे अनेक राजकीय, अ-राजकीय चर्चांना उधाण आलय. या चित्रपटामध्ये नक्की काय असणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सिनेमातून जनतेला साद घालण्याचा प्रयत्न?
मनसे यंदा स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सध्या मनसे करतेय. त्यातच हा पक्षाशी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संबंधित चित्रपट येणार आहे. त्यामुळे या चित्रपटातून लोकांना साद घालण्याचा आणि पक्षाबद्दल लोकांची भूमिका बदलण्याचा या चित्रपटच्या माध्यमातून प्रयत्न होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
मतदारांवर छाप पाडण्यासाठी चित्रपटांची निर्मिती
त्यामुळे गेल्या काही वर्षात राज्यातलं देशातलं राजकारण तापलेलं आहे. त्यामुळे राजकीय व्यक्ती किंवा पक्ष यांची मतदारांवर छाप पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात चित्रपटांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे इतर चित्रपटांप्रमाणेच मनसे पक्षाच्या संबंधित आगामी चित्रपट हा मतदारांवर किती प्रभाव पाडतो हे देखील पाहावे लागणार आहे.
मागील काही वर्षात राजकीय नेत्यांसंदर्भात आलेल्या चित्रपटांचा त्या त्या परिस्थितीनुसार प्रेक्षकांवर प्रभाव होत असल्याचं पाहायला मिळालं. सर्वसामान्य चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची मतं त्या चित्रपटात मांडलेल्या कथानकानुसार तयार होतात किंवा लोकं मनोरंजन सोडून देतात. त्यामुळे राज ठाकरे आणि पक्ष यांच्याशी संबंधित येणार हा नवा सिनेमा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जर बनवण्यात आला असेल तर तो जनमतावर छाप पाडणार की केवळ मनोरंजनच करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
ही बातमी वाचा :
Bigg Boss Marathi Season 5 : रितेशने दाखवली जागा, बिग बॉसच्या घरातून होणार जान्हवीची हकालपट्टी?