एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil on Ajay Baraskar : अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप, हा भोंदू महाराज, आंदोलन संपवण्याचा डाव; मनोज जरांगे पाटलांचा कडाडून हल्लाबोल

Manoj Jarange Patil : जय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी हा सरकारी ट्रॅप असल्याचा आरोप केला. हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली.

Manoj Jarange Patil : अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेनंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली. अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी हा सरकारी ट्रॅप असल्याचा आरोप केला. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट असल्याचा घणाघातही जरांगे पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांवरून केला. बावळटकर बाबाला उत्तर सुद्धा देणार नाही, काय बोंबलायचं ते बोंबल, अन्यथा याला वेगळं वळण लागू शकतं, असा इशाराही त्यांनी दिला. सगसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील त्यांनी केली. 

तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव

जरांगे पाटील यांनी अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, मराठा समाजाचं वाटोळं करू नका. तुकाराम महाराजांबद्दल बोललो असल्यास माफी मागतो, हवं तर तोंडावर मारून घेतो, बारसकरांची माफी मागणार नाही. मला पाणी पाजून त्याला मोठं व्हायचं होतं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

आरक्षण आंदोलन संपवण्यासाठी डाव  

मराठा आरक्षण आंदोलन संपवण्यासाठी हा ट्रॅप असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. एक ट्रॅप झाला असून त्यावेळी त्याला जागा मिळाली नाही  हा दुसरा ट्रॅप असून प्रत्येकवेळी कोणीतरी घुसवण्याचा डाव आहे. सरकारचा ट्रॅप सुरु झाला असून सरकारने ट्रॅप बंद करावेत. अजून 16 ते 17 ट्रॅप असून सरकार यांना मायाजाळ्यात अडकवत आहे, आमिष दाखवून भुलवत असल्याचा आरोप त्यांनी केला. या दोन चार जणांना आंदोलनात काही मिळवायच होतं, ते मिळाले नसेल. मुख्यमंत्र्यांच्या पीएसोबत आला होता. आतापर्यंत त्यांना मी 6 महिने गोड होतो. त्यांना ट्रॅप करायचा होता, त्यात शिंदे साहेबांचा आणि त्याचा एक माणूस होता. शिंदे साहेबांचा प्रवक्ता देखील आहे. तो मला बदनाम करण्याचा सरकारचा ट्रॅप होता. 

मनोज जरांगेंनी स्पष्ट केली आंदोलनाची दिशा 

दरम्यान, 24 फेब्रुवारीपासून महाराष्ट्राततील प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन होईल, सकाळी साडे दहापासून एकपर्यंत हे आंदोलन होईल, अशी घोषणा त्यांनी केली. आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांनी आमच्या घरासमोरून जायचं नाही. 1 तारखेला वृद्ध नागरिकांना घेऊन आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. कोणी आमदार आमच्या मुलांवर जाणून बुजून अन्याय करेल, तर त्यांना जाब विचारला जाईल, असेही ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget